माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लाईट्स, कॅमेरा, ॲक्रिडीशन!


56व्या इफ्फीकरिता माध्यम अधिस्वीकृतीसाठी अंतिम तारीख 5 नोव्हेंबर – त्वरित अर्ज करा!

माध्यमांसाठी वैशिष्ट्यपूर्ण संधी: इफ्फी 2025 मध्ये एफटीआयआयचा चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम

Posted On: 29 OCT 2025 6:00PM by PIB Mumbai

मुंबई, 29 ऑक्टोबर 2025

माध्यम प्रतिनिधी म्हणून 56 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) सहभागी होण्याची संधी तुम्ही शोधत आहात काय?

या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधी म्हणून लगेच नोंदणी करा:

https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx

गोव्यात पणजी येथे दिनांक 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 56 व्या इफ्फीचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिस्वीकृत  माध्यम व्यावसायिकांना या महोत्सवातील चित्रपट सादरीकरणे, गट चर्चा, मास्टर क्लासेस तसेच जगभरातील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी आयोजित नेटवर्किंग सत्रे अशा विविध कार्यक्रमांमध्ये विशेषत्वाने प्रवेश दिला जाईल.

यामध्ये आणखी भर घालत, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतर्फे (एफटीआयआय) 18 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये केवळ अधिस्वीकृतीप्राप्त  माध्यम प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी अशा अभ्यासक्रमात सहभागी होऊ न शकलेल्या पत्रकारांना यावर्षीच्या प्रवेशाच्या वेळी प्राधान्य दिले जाईल.

माध्यम प्रतिनिधींनी हे लक्षात घ्यावे की माध्यम अधिस्वीकृतीसाठीचे पोर्टल 05 नोव्हेंबर 2025 पर्यंतच खुले  असेल.

अर्जदारांनी पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे आणि वैध ओळखपत्र तसेच व्यावसायिक अधिकारपत्रांसह सर्व आवश्यक दस्तावेज अपलोड करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तपशीलवार पात्रता निकष आणि दस्तावेजीकरणविषयक मार्गदर्शक सूचना संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

यासंबंधी कोणतीही मदत किंवा चौकशी साठी कृपया iffi.mediadesk@pib.gov.in येथे पीआयबी इफ्फी माध्यम सहाय्य  डेस्कशी संपर्क साधावा.

पत्रसूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा म्हणाले,

"इफ्फी हा जगभरातील वैविध्यपूर्ण चित्रपटीय आवाजांना एकत्र आणणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. अधिस्वीकृती मिळवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणे सुनिश्चित करून घेण्याप्रती तसेच या प्रतिष्ठित सोहोळ्याची समग्र  माहिती मिळवण्यासाठी पत्रकारांना मदत करण्याप्रती पत्रसूचना कार्यालय कटिबद्ध आहे." 

गोव्यात पणजीच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर प्रदर्शनासाठी सज्ज झालेला इफ्फी सोहोळा जागतिक सहयोग आणि सर्जकतेची जोपासना करतानाच, भारताच्या चित्रपटीय वारशाचा उत्सव साजरा करतो. दर वर्षी 45,000 पेक्षा जास्त चित्रपट रसिक आणि व्यावसायिक या नऊ दिवसांच्या चित्रपटीय महोत्सवासाठी एकत्र येतात आणि जगभरातील प्रेक्षकांना प्रेरित करणाऱ्या, आव्हान देणाऱ्या आणि एकमेकांशी जोडणाऱ्या कथांचा रसास्वाद घेतात. आशियातील या प्रमुख चित्रपट उत्सवाचा भाग होण्याची संधी चुकवू  नका. आजच अर्ज करा आणि चित्रपटांच्या भव्य रंगमंचाकडे म्हणजेच इफ्फी 2025 कडे नेणारा तुमचा मार्ग निश्चिंत  करा!

महत्त्वाची माहिती:

👉🏻 माध्यमांना अधिस्वीकृतीसाठीचे पोर्टल:  accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx

👉🏻 माध्यम अधिस्वीकृती पोर्टल 15 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर 2025 या काळात सक्रीय असेल.

👉🏻 महोत्सवाच्या तारखा : 20 ते 28 नोव्हेंबर 2025

👉🏻 स्थळ: पणजी, गोवा.

👉🏻 चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाची तारीख : 18 नोव्हेंबर 2025

👉🏻 मदतीसाठी ईमेल: iffi.mediadesk@pib.gov.in


पीआयबी मुंबई |निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2183884) Visitor Counter : 74