पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वन रँक वन पेन्शन ही योजना म्हणजे देशाचे संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या आपल्या माजी सैनिकांच्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शौर्य आणि बलिदानाचा गौरव : पंतप्रधान


वन रँक वन पेन्शन योजनेतून सशस्त्र दलांच्या कल्याणासाठी सरकारची वचनबद्धता दिसून येते : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 07 NOV 2024 9:39AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 नोव्‍हेंबर 2024

 

आज वन रँक वन पेन्शन या योजनेला दहा वर्षे पूर्ण झाली. यानिमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश सामायिक केला आहे, ही योजना म्हणजे देशाचे संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या आपल्या माजी सैनिकांच्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शौर्य आणि बलिदानाचा गौरव असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. आज वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय म्हणजे यासंदर्भातली दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली  मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होते, तसेच हा आपल्या वीर जवानांप्रती राष्ट्राची कृतज्ञता पुन्हा एकदा सिद्ध करणारा निर्णय होता, असेही त्यांनी म्हटले आहे. आपले सशस्त्र दल अधिक मजबूत करण्यासाठी आणि देशाची सेवा करणाऱ्या जवानांच्या कल्याणासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत राहील अशी ग्वाहीदेखील पंतप्रधानांनी या संदेशातून दिली आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश:

आजच्या दिवशी, #OneRankOnePension (OROP) योजना लागू करण्यात आली होती. ही योजना देशाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या आपल्या माजी सैनिकांच्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शौर्य आणि बलिदानाचा गौरव होता. वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय म्हणजे यासंदर्भातली दीर्घकाळापासून प्रलंबित मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल होते आणि आपल्या वीरांप्रती राष्ट्राची कृतज्ञता पुन्हा सिद्ध करणारा निर्णय होता.

तुम्हा सर्वांना हे जाणून आनंद होईल की, या दशकभरात लाखो निवृत्तीवेतनधारक आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबियांना या ऐतिहासिक उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. आकडेवारीच्याही पलीकडे, वन रँक वन पेन्शन योजनेतून सशस्त्र दलांच्या कल्याणासाठी सरकारची वचनबद्धता दिसून येते. आपल्या सशस्त्र दलांना अधिक बळकट करण्यासाठी आणि आपली सेवा करणाऱ्या जवानांच्या कल्याणासाठी आम्ही नेहमीच शक्य ते सर्व काही करत राहू.

#OneRankOnePension

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2183841) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Telugu , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam