पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी मुख्य आर्थिक सल्लागार प्राध्यापक कृष्णमूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

प्रविष्टि तिथि: 16 AUG 2024 10:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024

 

माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सध्याचे कार्यरत संचालक प्राध्यापक कृष्णमूर्ती व्ही. सुब्रमण्यम यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. लेखन आणि धोरणाबद्दलची त्यांची आवड जोपासल्याबद्दल पंतप्रधानांनी प्राध्यापक सुब्रमण्यम यांचे कौतुक केले.

प्राध्यापक सुब्रमण्यम यांच्या यांनी एक्स मंचावर केलेल्या पोस्टला पंतप्रधानांनी उत्तर दिले.

“कृष्णमूर्ती सुब्रमण्यम तुम्हाला भेटून आनंद झाला! नेहमीप्रमाणे, कल्पना आणि अंतदृष्टींनी परिपूर्ण. तुम्ही लेखन आणि धोरणाबद्दलची तुमची आवड कायम ठेवली आहे हे पाहून आनंद झाला.”

 

* * *

जयदेवी पुजारी-स्वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2183171) आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam