पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी विकसित भारत युवा नेते संवाद 2.0 मध्ये सहभागी होण्याचे युवकांना केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
27 OCT 2025 10:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील युवकांना विकसित भारत युवा नेते संवाद 2.0 मध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘युवा नेते संवाद’ म्हणजे राष्ट्र उभारणीत अर्थपूर्ण योगदान देण्याची ही एक मौल्यवान संधी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी सर्व तरुण नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आणि विकसित भारतासाठी आपला दृष्टिकोन सामायिक करण्याचे आवाहन केले. त्यांनी तरुणांसाठी विशेषत्वाने आखण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होऊन या संवादात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
समाज माध्यम ‘एक्स’ वरील आपल्या संदेशात,पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले:
“विकसित भारत युवा नेते संवाद 2.0 ही आपल्या तरुणांसाठी राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची एक उत्तम संधी आहे. आपल्या तरुणांचे विचार आणि अंतर्दृष्टी विकसित भारत उभारणीचा मार्ग प्रशस्त करू शकतात.
या संवादात भाग घेण्याचा मार्ग म्हणजे प्रथम यासाठी खास तयार केलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत भाग घ्यावा . मी तुम्हा सर्वांना या लिंकव्दारे सहभागी होण्याचे आवाहन करतो...
https://mybharat.gov.in/quiz”
निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2183165)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam