पंतप्रधान कार्यालय
वाराणसीमध्ये देव दिवाळी साजरी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
15 NOV 2024 10:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजऱ्या होणाऱ्या देव दिवाळीनिमित्त लाखो दिव्यांनी चमचमणाऱ्या काशी शहराला पाहून आनंद व्यक्त केला आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“देव दिवाळीच्या निमित्ताने लाखो दिव्यांनी चमचमत प्रकाशमान झालेल्या बाबा विश्वनाथांच्या काशी शहराचे भव्य दृश्य मनाला मोहवून टाकत आहे. जगभरातील लोक दीपदानाच्या या परंपरेचे साक्षीदार होतात. गंगा मातेच्या चारही काठांवर पसरलेला हा दिव्य प्रकाश सर्वांचे जीवन आनंद, शांती, समृद्धी आणि निरामय आरोग्याने उजळवून टाको, या माझ्या सदिच्छा!”
* * *
आशिष सांगळे/संपदा पटगावकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183107)
अभ्यागत कक्ष : 27
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam