पंतप्रधान कार्यालय
पियुष पांडे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2025 11:29AM by PIB Mumbai
जाहिरात आणि संवादक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व पियूष पांडे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एका शोक संदेशात पंतप्रधानांनी पांडे यांच्या विलक्षण सर्जनशीलतेचे आणि भारताच्या जाहिरात क्षेत्रातील त्यांच्या अमुल्य योगदानाचे स्मरण केले.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
"पियूष पांडे यांचे त्यांच्या सर्जनशीलतेसाठी सर्वत्र कौतुक होते. त्यांनी जाहिरात आणि संवादक्षेत्राच्या जगात अमुल्य योगदान दिले. आमच्यात झालेल्या अनेक संवादाच्या आठवणी आहेत. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले, त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना, ओम शांती."
***
नेहा कुलकर्णी / राज दळेकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2182063)
आगंतुक पटल : 65
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam