उपराष्ट्रपती कार्यालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांची घेतली भेट
Posted On:
21 OCT 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आज संसद भवनात उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली.
बैठकीदरम्यान, उपराष्ट्रपतींना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांची आणि कार्याविषयी माहिती देण्यात आली. या चर्चेत उत्पादन आणि परदेशी व्यापाराची सद्यस्थिती तसेच व्यवसाय सुलभता वाढवणे, भारताच्या उत्पादन क्षमतांना बळकटी देणे आणि देशाला जागतिक निर्यात केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत चर्चा झालेल्या प्रमुख उपक्रमांमध्ये मेक इन इंडिया, उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजना, पीएम गति शक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा, स्टार्ट-अप इंडिया, राष्ट्रीय उत्पादन अभियान, मुक्त व्यापार करार (एफटीए), एक जिल्हा एक उत्पादन, औद्योगिक कॉरिडॉर, विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) आणि बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण यांचा समावेश होता.
उपराष्ट्रपतींनी भारताला उत्पादन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारांचे स्वागत केले. तसेच त्यांनी ‘विकसित भारता’चे स्वप्न साध्य करण्यासाठी सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये समन्वित कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2181384)
Visitor Counter : 8