कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली फिलीपिन्समध्ये ज्ञान विनिमय मोहिम

Posted On: 21 OCT 2025 3:56PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी 20 ते 22 ऑक्टोबर 2025 दरम्यान फिलीपिन्समध्ये आयोजित उच्चस्तरीय ज्ञान विनिमय मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. ही मोहीम जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.

भारतीय शिष्टमंडळात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा राज्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

या मोहिमेत – स्थलांतरित कामगार विभाग (डीएमडब्ल्यू), तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य विकास प्राधिकरण (टीईएसडीए), फिलीपिन्स सांख्यिकी प्राधिकरण (पीएसए) आणि परदेशी कामगार कल्याण प्रशासन (ओडब्ल्यूडब्ल्यूए) यासारख्या फिलीपिन्समधील प्रमुख संस्थांशी धोरणात्मक संवाद आयोजित करण्यात आला आहे.

कौशल्य विकास, कामगार गतिशीलता आणि डेटा-आधारित धोरणात्मक आराखडे’संबंधित क्षेत्रातील ज्ञान विनिमय आणि सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करणे हे या भेटीचे उद्दिष्ट आहे.

ही मोहीम ग्लोबल साउथ देशांमधील मानव संसाधन विकासात सहकार्य करण्याची, परस्पर शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची तसेच कौशल्य आणि उद्योजकतेद्वारे समतापूर्ण आणि शाश्वत विकासासाठी मार्ग तयार करण्याची सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित करते.


 
 

 

फिलिपिन्स सरकारच्या स्थलांतरित कामगार विभागासोबत (डीएमडब्ल्यू) बैठक 
 
 

 

 

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2181256) Visitor Counter : 11