पंतप्रधान कार्यालय
जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
21 OCT 2025 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची यांचे हार्दिक अभिनंदन केले. X या समाजमाध्यमावरच्या संदेशात, पंतप्रधान मोदींनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.
मोदींनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:
"जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची, आपले हार्दिक अभिनंदन. भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आपल्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.आपले दृढ होत असलेले संबंध हिंद-प्रशांत आणि त्यापलीकडे शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे आहेत.@takaichi_sanae"
निलीमा चितळे/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2181213)
Visitor Counter : 10
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam