अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालयाने तुतीकोरिन बंदरात 'ऑपरेशन फायर ट्रेल' अंतर्गत 5.01 कोटी रुपये किमतीच्या 83,520 चिनी फटाक्यांची रोखली तस्करी ; 4 जणांना अटक

Posted On: 19 OCT 2025 6:42PM by PIB Mumbai

 

दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या सक्रीय कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 'ऑपरेशन फायर ट्रेल' या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात दोन चाळीस फूट कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले, जे अभियांत्रिकी वस्तू म्हणून चुकीच्या पद्धतीने घोषित केले गेले होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 5.01 कोटी रुपये इतकी असून तो सिलिकॉन सीलंट गनच्या कव्हर कार्गोसह जप्त करण्यात आला.

14 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यानच्या समन्वयित कारवाई दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी तुतीकोरिन येथे आयातदाराला अटक केली. पुढील तपासानुसार, चेन्नई आणि तुतीकोरिन येथून आणखी तीन व्यक्तींना (मुंबईतील दोन व्यक्तींसह) अटक करण्यात आली आहे. सर्व चार आरोपींना या तस्करी प्रकरणात त्यांच्या समन्वयित भूमिकेसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

फटाक्यांची आयात ही परराष्ट्र व्यापार धोरणातील आयटीसी (एचएस) वर्गीकरणानुसार प्रतिबंधित असून यासाठी विदेश व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) आणि पेट्रोलियम आणि खोटके सुरक्षा संस्था (पीईएसओ) यांच्याकडून स्फोटक नियम, 2008 अंतर्गत परवाना घेणे आवश्यक आहे. अशी बेकायदेशीर आयात आणि चुकीची घोषणा ही केवळ परराष्ट्र व्यापार आणि सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन नाही तर फटाक्यांच्या अत्यंत ज्वलनशील स्वरूपामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि बंदराच्या पायाभूत सुविधांना गंभीर धोका निर्माण करते.

तस्करी विरोधी कारवायांमध्ये सजग राहून राष्ट्रीय पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि जनतेच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सामना करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय वचनबद्ध आहे.

***

शैलेश पाटील / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2180922) Visitor Counter : 11