महिला आणि बालविकास मंत्रालय
आठव्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमाची सांगता, उद्या डेहराडून येथे समारोप समारंभ साजरा करून होणार
Posted On:
16 OCT 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2025
पोषण म्हणजे केवळ अन्नसेवन नसून ते सामर्थ्यशाली, निरामय आणि अधिक सक्षम भारताचे, संगोपन करण्याचे प्रतिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, 17 सप्टेंबर 2025 रोजी मध्य प्रदेशातील धार येथून 8 व्या राष्ट्रीय पोषण महिना (17 सप्टेंबर-16 ऑक्टोबर 2025) उपक्रमाचा आरंभ करण्यात आला,ज्यामध्ये महिलांचे आरोग्य आणि पोषण हे सक्षम कुटुंब आणि विकसित भारताचा पाया आहे यावर भर देण्यात आला.
आठव्या राष्ट्रीय पोषण महिना 2025 चा समारोप समारंभ उद्या (17 ऑक्टोबर 2025) उत्तराखंडमधील देहरादून येथील हिमालयीन सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत देशभरात पोषणाविषयी जागरूकता, लोक सहभाग आणि वर्तणुकीत बदल करण्यासाठी समर्पित असलेल्या महिनाभर चालणाऱ्या या जनचळवळीचा हा समारोप समारंभ आहे.
या समारंभाला भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री सावित्री ठाकूर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील, तर उत्तराखंड सरकारच्या महिला सक्षमीकरण आणि बाल विकास मंत्री रेखा आर्य आणि उत्तराखंड सरकारमधील ग्रामीण विकास मंत्री गणेश जोशी उपस्थित राहतील. भारत सरकार आणि उत्तराखंड सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस देखील या सोहळ्यात सहभागी होतील.
महिला आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत, व्यापक आरोग्य तपासणी आणि सेवांवर भर देऊन या वर्षी पोषण महिना चळवळीद्वारे देशभरात "स्वस्थ नारी, सशक्त परिवार" ही प्रमुख संकल्पना अधोरेखित केली गेली. या समारोप समारंभात समुदाय एकजूट , क्षेत्रीय उपक्रम आणि पोषण क्षेत्रातील उपक्रमांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे तसेच पोषण आणि मिशन शक्ती चॅम्पियन्स या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला जाईल. ही सामूहिक कृती, सुपोषित आणि विकसित भारताच्या जनचळवळीला पुढे नेत आगेकूच करत आहे.
जयदेवी पुजारी-स्वामी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2180003)
Visitor Counter : 8