रेल्वे मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 'भविष्यासाठी सज्ज रेल्वे' या संकल्पनेवरील 16 व्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन-2025 चे उद्घाटन
Posted On:
15 OCT 2025 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2025
रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे 16 व्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन-2025 चे उद्घाटन केले. हे आशिया खंडातील सर्वात मोठे, तर जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी 320 किमी प्रतितास ऑपरेटिंग गतीसह 350 किमी प्रतितास कमाल वेगासाठी डिझाइन केलेले समर्पित प्रवासी कॉरिडॉर विकसित करण्याची योजना जाहीर केली. ते म्हणाले की, देशभरात असे अनेक कॉरिडॉर बांधले जातील, जे सरकारच्या विकसित भारत दृष्टिकोनाचा एक भाग असून, या अंतर्गत 2047 साला पर्यंत सुमारे 7,000 किमी समर्पित मार्गांचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. हे कॉरिडॉर देशांतर्गत विकसित सिग्नलिंग प्रणाली आणि आधुनिक ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (ओसीसी) याने सुसज्ज असतील.
वंदे भारत हे मोठे यश आह, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. तांत्रिक बाबींमध्ये, ते जगातील सर्वोत्तम उपक्रमांच्या बरोबरीचे आहे. भारत, निर्यात बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रित करून पुढील पिढीच्या हाय-स्पीड ट्रेनवर काम करत आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की भारत सध्या वंदे भारत 3.0 चालवत असून, त्यामध्ये यापूर्वीच्या आवृत्त्यांपेक्षा लक्षणीय सुधारणा दिसून येते. वंदे भारत 3.0 ही गाडी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करत असून, ती केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते, आवाज आणि कंपन पातळी नियंत्रित ठेवते आणि जपान आणि युरोपमधील अनेक गाड्यांपेक्षा ती वेगवान आहे. ते पुढे म्हणाले की, येत्या 18 महिन्यांत वंदे भारत 4.0 सुरू होण्याची अपेक्षा असून, कामगिरी आणि प्रवाशाना मिळणारा अनुभव, या प्रत्येक पैलूमध्ये जागतिक मापदंड प्रस्थापित करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. नवीन आवृत्ती शौचालयांचा आणि आसनांचा दर्जा सुधारणे आणि एकूण सुसज्जता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करेल. म्हणाले की, वंदे भारत 4.0 या गाडीला जागतिक दर्जा म्हणून प्रस्थापित करणे हे उद्दिष्ट असून, ही गाडी गुणवत्ता आणि आराम यामध्ये इतकी प्रगत असेल की जगभरातील देश तिचा स्वीकार करण्यासाठी उत्सुक असतील.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार आणि गतिशक्ती विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. (डॉ.) मनोज चौधरी, यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 'भविष्यासाठी सज्ज रेल्वे' या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन 15 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 15 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधित्व करणारे 450 हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार असून, ते आधुनिक रेल्वे आणि मेट्रो उत्पादने, नवोन्मेष आणि शाश्वत उपाय प्रदर्शित करतील.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179693)
Visitor Counter : 5