रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फास्टॅग वार्षिक पासने प्रारंभानंतर दोन महिन्यात ओलांडला पंचवीस लाख वापरकर्त्यांचा टप्पा

Posted On: 15 OCT 2025 7:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2025

‘प्रवास सुलभता’ वाढवणाऱ्या फास्टॅग वार्षिक पासला राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला असून गेल्या दोन महिन्यांत देशभरात सुमारे 5.67 कोटी व्यवहारांसह पंचवीस लाख वापरकर्त्यांचा ऐतिहासिक आकडा ओलांडला आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी सुरू करण्यात आलेला फास्टॅग वार्षिक पास राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना एक अखंड आणि किफायतशीर प्रवास पर्याय प्रदान करतो आणि राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवरील सुमारे 1,150 टोल प्लाझावर तो लागू आहे.

वार्षिक पास एक वर्ष वैधतेसाठी 3,000 रुपये किंवा 200 टोल प्लाझा ओलांडण्यासाठी एक-वेळ शुल्क भरून वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची आवश्यकता दूर करतो. वैध फास्टॅग असलेल्या सर्व बिगर-व्यावसायिक वाहनांसाठी हा पास लागू आहे. राजमार्गयात्रा अ‍ॅप किंवा एनएचएआय संकेतस्थळाद्वारे एक-वेळ शुल्क भरल्यानंतर वाहनाशी जोडलेल्या विद्यमान फास्टॅगवर वार्षिक पास दोन तासांच्या आत सक्रिय होतो.

वार्षिक पास हस्तांतरणीय नसून राष्ट्रीय महामार्ग (एनएच) आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्ग (एनइ) फी प्लाझावर वैध आहे. राज्य सरकारे किंवा स्थानिक संस्थांद्वारे व्यवस्थापित केलेल्या एक्सप्रेसवे, राज्य महामार्ग (एसएच) वरील फी प्लाझावर, फास्टॅग राज्य महामार्ग टोल आणि पार्किंग इत्यादी ठिकाणी देयकांसाठी विद्यमान वॉलेट बॅलन्स वापरेल.

राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांकडून फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षित, सुरळीत आणि अखंड प्रवास अनुभव प्रदान करण्याची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बांधिलकी अधोरेखित करतो.


शैलेश पाटील/वासंती जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2179595) Visitor Counter : 7