दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत 15 ऑक्टोबर 2025 पासून अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय टपाल सेवा पुन्हा सुरू करणार

Posted On: 14 OCT 2025 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑक्‍टोबर 2025

 

भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाला घोषणा करताना आनंद होत आहे की 15 ऑक्टोबर 2025 पासून अमेरिकेसाठी सर्व श्रेणीमधल्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवा पुन्हा सुरू होत आहेत. 

अमेरिकेन प्रशासनाने जारी केलेल्या कार्यकारी आदेश 14324 नंतर, 22 ऑगस्ट 2025  रोजीच्या निवेदनाद्वारे अमेरिकेसाठी टपाल सेवा स्थगित करण्यात आली होती  ज्यात सर्व टपाल शिपमेंटसाठी किमान व्यवहार थांबवण्यात आले होते. आयात शुल्क वसूल करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी अमेरिकेच्या  कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) द्वारे लागू केलेल्या नवीन नियामक आवश्यकतांमुळे ही स्थगिती  आवश्यक होती.

व्यापक प्रणाली विकास, सीबीपी -मान्यताप्राप्त  पात्र पक्षांशी समन्वय आणि दिल्ली आणि महाराष्ट्र परिमंडळांमध्ये यशस्वी परिचालन  चाचण्यांनंतर, इंडिया पोस्टने आता डिलिव्हरी ड्यूटी पेड (DDP) प्रक्रियेसाठी एक अनुपालन यंत्रणा स्थापित केली आहे. या नवीन व्यवस्थेअंतर्गत, अमेरिकेला पाठवल्या जाणाऱ्या शिपमेंटवरील सर्व लागू सीमाशुल्क बुकिंगच्या वेळी भारतात आगाऊ वसूल केले जातील आणि मान्यताप्राप्त पात्र पक्षांद्वारे थेट सीबीपीला पाठवले जातील. यामुळे पूर्ण नियामक अनुपालन, वेगवान सीमाशुल्क मंजुरी आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय किंवा विलंबाशिवाय अमेरिकेतील प्राप्तकर्त्यांना अखंड वितरण सेवा सुनिश्चित होईल.

सीबीपी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायदा (आयईईपीए) शुल्क (उत्पत्ती देश भारत) अंतर्गत, भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या पोस्टल शिपमेंटवर  घोषित एफओबी मूल्याच्या 50% दराने सीमा शुल्क लागू आहे. कुरिअर किंवा व्यावसायिक कन्साइनमेंटप्रमाणे , पोस्टल वस्तूंवर कोणतेही अतिरिक्त शुल्क  किंवा उत्पादन-विशिष्ट शुल्क आकारले जात नाही. या अनुकूल शुल्क रचनेमुळे निर्यातदारांसाठी एकूण खर्चाचा भार लक्षणीयरीत्या कमी होतो, ज्यामुळे टपाल सेवा  एमएसएमई, कारागीर, छोटे व्यापारी आणि ई-कॉमर्स निर्यातदारांसाठी अधिक परवडणारी आणि स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स पर्याय ठरते.

महत्त्वाचे म्हणजे, टपाल विभाग ग्राहकांवर डीडीपी आणि क्वालिफाइड पार्टी सेवा सुलभ करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. टपाल शुल्कात कोणतेही बदल होणार नाहीत, ज्यामुळे निर्यातदारांना अमेरिकेच्या सुधारित आयात आवश्यकतांचे पालन करताना परवडणाऱ्या आंतरराष्ट्रीय वितरण दरांचा फायदा मिळत राहील. किफायतशीरता  राखण्यासाठी, एमएसएमईंना पाठिंबा देण्यासाठी आणि टपाल सेवेद्वारे  भारताच्या निर्यातीला चालना देण्यासाठी हा उपाय सुरू करण्यात आला आहे.

ग्राहक आता कोणत्याही पोस्ट ऑफिस, इंटरनॅशनल बिझनेस सेंटर (आयबीसी), किंवा डाक घर निर्यात केंद्र (डीएनके) किंवा www.indiapost.gov.in या स्वयं-सेवा पोर्टलद्वारे अमेरिकेत डिलिव्हरीसाठी सर्व श्रेणीतील आंतरराष्ट्रीय मेल - ईएमएस, एअर पार्सल, नोंदणीकृत पत्रे/पॅकेट्स आणि ट्रॅक केलेले पॅकेट्स - बुक करू शकतात.

डिलिव्हरी ड्यूटी पेड (डीडीपी) व्यवस्था  व्यवसाय सुलभता  वाढवते आणि कर संकलनात  संपूर्ण पारदर्शकता आणते. पार्सल पाठवणारे आता भारतात सर्व लागू शुल्क आधी भरू शकतात, ज्यामुळे एकूण शिपिंग खर्चाचा अंदाज येतो आणि परदेशातील व्यक्तीला  सुलभ  वितरण सेवेचा अनुभव मिळतो.

टपाल निर्यात सेवेद्वारे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यातदार, छोटे व्यवसाय आणि उद्योजकांसाठी जागरूकता आणि संपर्क  कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना परिमंडळांच्या प्रमुखांना करण्यात आली आहे.

टपाल सेवेचा हा  पुन्हा आरंभ भारताच्या आंतरराष्ट्रीय टपाल आणि निर्यात लॉजिस्टिक्स नेटवर्कला बळकटी देण्यात एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि समावेशक, निर्यात-चालित आर्थिक विकासाच्या सरकारच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यात इंडिया पोस्टची वाढती भूमिका यातून प्रतिबिंबित होते.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179159) Visitor Counter : 8