इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्र सरकारने भारत-एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 अंतर्गत एकूण 5.85 कोटी रुपयांच्या एकूण पारितोषिक रकमेसह तीन ग्लोबल इम्पॅक्ट स्पर्धांसाठी अर्ज मागवले, यासाठी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदत
नवोन्मेषकर्त्यांना मार्गदर्शन, गुंतवणूकदारांपर्यंत पोहोच आणि सामाजिक तसेच आर्थिक प्रभावासाठी उच्च क्षमतेचे एआय प्रेरित उपाय विकसित करून त्यांच्या संकल्पनांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन
Posted On:
13 OCT 2025 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2025
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर केलेल्या सरकारच्या तीन महत्त्वपूर्ण ग्लोबल इम्पॅक्ट स्पर्धांसाठी आता अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या स्पर्धांच्या विजेत्यांसाठी एकूण 5.85 कोटी रुपयांची बक्षिसे आहेत. एआय (कृत्रिम बुद्धिमता) फॉर ऑल: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज, एआय बाय हर: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज आणि वाययुव्ही(युव्ह)एआय: ग्लोबल युथ चॅलेंज हे तीन उपक्रम सामाजिक तसेच आर्थिक परिणामासाठी उच्च क्षमतेसह परिवर्तनशील एआय-प्रेरित साधने निश्चित करणे, त्यांची जोपासना करणे आणि त्यांचे सादरीकरण करणे या उद्देशाने सुरु करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांद्वारे नवोन्मेषकर्त्यांना मार्गदर्शन, गुंतवणूकदारांपर्यंत पोहोच आणि त्यांच्या संकल्पनांना मोठे जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतील. या स्पर्धा शिखर परिषदेच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावर लाईव्ह आहेत.
https://impact.indiaai.gov.in/
समावेशक, जबाबदार आणि वाढीव एआय साधनांना गती देण्याच्या दृष्टीने या ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकणाऱ्या पथदर्शी संकल्पनांना प्रेरित करून पाठबळ पुरवणे हे या स्पर्धांचे ध्येय आहे. येत्या 19 आणि 20 फेब्रुवारी, 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित भारत-एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये निवडक नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण होईल.
सरकारच्या तीन महत्त्वपूर्ण ग्लोबल इम्पॅक्ट स्पर्धा कोणत्या आहेत?
1) एआय फॉर ऑल: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज
या क्षेत्राच्या उच्च क्षमतेचे मोठ्या प्रमाणात दर्शन घडवणाऱ्या आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि जागतिक गरजांवर उपाय शोधणाऱ्या एआय नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठीचे जागतिक आवाहन. या स्पर्धेत कृषी, हवामान आणि शाश्वतता, शिक्षण, आर्थिक समावेशन, आरोग्य सेवा, उत्पादन, शहरी पायाभूत सुविधा आणि गतिमानता यांच्यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांसह वाईल्डकार्ड/ खुल्या नवोन्मेष मार्गांमध्ये वापरता येण्याजोग्या एआय साधनांचा शोध घेण्यात येईल.
पारितोषिके आणि सहाय्य:
· पहिल्या 10 विजेत्यांसाठी 2.5 कोटी रुपयांपर्यंतची पारितोषिके
· अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या 20 स्पर्धकांना (प्रत्येकी 2 सदस्यांपर्यंत) भारत-एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवासखर्चाची मदत करण्यात येईल.
· मार्गदर्शक, गुंतवणूकदारांशी संपर्क, कॉम्प्युट/ क्रेडीट तसेच परिषद पश्चात प्रवेगक मार्ग यांची उपलब्धता
पात्रता: जागतिक पातळीवर विद्यार्थी, संशोधक, कार्यरत व्यावसायिक, कंपन्या तसेच प्रायोगिक पातळीवरील अथवा वाढीसाठी सज्ज असलेल्या एआयसाधने-युक्त स्टार्ट अप उद्योग यांच्यासाठी ही स्पर्धा खुली आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
2) एआय बाय हर: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज
महिलांच्या नेतृत्वाखालील एआय नवोन्मेषांच्या मालिकेला बळकटी देणे हे नीती आयोगाच्या महिला उद्योजकता मंचाने इतर ज्ञानभागीदारांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या समर्पित स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. कृषी, सायबर सुरक्षा आणि डिजिटल स्वास्थ्य, शिक्षण,आरोग्यसुविधा, उर्जा तसेच हवामान आणि वाईल्डकार्ड/ खुले नवोन्मेष यांसारख्या क्षेत्रांमध्ये भरीव सामाजिक प्रभाव साध्य करणाऱ्या एआय साधनांच्या प्रस्तावासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पुरस्कार आणि पाठबळ:
सर्वोच्च 10 विजेत्यांना 2.5 कोटी रुपयांपर्यंतचे पुरस्कार.
शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 30 अंतिम स्पर्धकांपर्यंत (प्रत्येकी दोन सदस्यांपर्यंत) प्रवास सहाय्य मिळेल.
जबाबदार एआय, गुंतवणूकदार मानसिकता आणि कथाकथन यावर आभासी माध्यमातून मूलभूत प्रशिक्षण.
30 उच्च-क्षमता असलेल्या संघांसाठी निवडक गुंतवणूकदार सहभाग.
पात्रता: जगभरातील महिलांच्या नेतृत्वाखालील संघ, विद्यार्थी संघ किंवा कार्यरत प्रारूप किंवा परिपक्व कृत्रिम बुद्धिमत्ताधारित उपाय असलेल्या महिलांच्या नेतृत्वाखालील संस्थांसाठी खुले.
येथे अर्ज करा
3) वाययुव्हीएआय : जागतिक युवा आव्हान
13-21 वर्षे वयोगटातील युवा नवोन्मेषकांना (व्यक्ती किंवा दोन जणांच्या संघांना) सार्वजनिक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताधारित उपाय विकसित करायला प्रोत्साहित करण्यासाठी संरचना केलेला एक युवा-प्रथम उपक्रम. सूचक संकल्पनांमध्ये वाइल्डकार्ड/खुली नवोन्मेष श्रेणीसह लोक आणि समुदायांना सक्षम बनविणे, प्रमुख क्षेत्रांमध्ये परिवर्तन करणे आणि भविष्यासाठी तयार पायाभूत सुविधा आणि स्मार्ट परिसंस्था तयार करणे समाविष्ट आहे.
पुरस्कार आणि पाठबळ:
एकूण 85 लाख रुपयांची बक्षिसे, ज्यात समाविष्ट घटक:
सर्वोच्च 3 विजेत्यांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये
त्यानंतरच्या 3 विजेत्यांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये
5 लाख रुपयांचे प्रत्येकी 2 विशेष मान्यता पुरस्कार
शीर्ष 20 सहभागींना शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रवास सहाय्य मिळेल.
10 दिवसांचे आभासी माध्यमातून मूलभूत प्रशिक्षण, गुंतवणूकदार प्रदर्शन संधी आणि कायमस्वरूपी ऑनलाइन प्रदर्शन आणि संग्रह प्रकाशन.
पात्रता: कार्यरत प्रारूप, पीओसी किंवा अवलंब करण्यायोग्य उपाय असलेल्या जगभरातील 13-21 वर्षे वयोगटातील तरुण नवोन्मेषकांसाठी खुले आहे.
येथे अर्ज करा.
कालमर्यादा आणि प्रमुख तारखा
· अर्ज खुले होण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2025
· अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2025
· व्हर्च्युअल बूटकॅम्प: नोव्हेंबर 2025
· अंतिम स्पर्धकांची घोषणा: 31 डिसेंबर 2025
· भव्य प्रदर्शन: इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026 (16-20 फेब्रुवारी 2026, नवी दिल्ली)
अर्ज कसा करावा
तिन्ही ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंजसाठी www.impact.indiaai.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे अर्ज सादर करता येतील:
प्रत्येक आव्हान पृष्ठ पात्रता निकष, कालमर्यादा, अर्ज सादरीकरणाची मार्गदर्शक तत्त्वे, संमती अर्ज आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न याबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते. अर्जदारांना सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अद्ययावत माहितीसाठी आणि शॉर्टलिस्टिंग आणि सहभागाशी संबंधित घोषणांसाठी नियमितपणे संकेतस्थळ तपासण्याचा सल्ला दिला जातो.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/वासंती जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178585)
Visitor Counter : 8