युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांसह केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी 'संडेज् ऑन सायकल' मोहिमेचे केले नेतृत्व, देशाच्या तंदुरूस्तीच्या प्रवासात मार्गदर्शन करण्याच्या आरोग्य व्यावसायिकांच्या भूमिकेवर दिला भर
प्रविष्टि तिथि:
12 OCT 2025 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2025
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसंच श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत आज, नागरिकांच्या तंदुरूस्ती आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रव्यापी उपक्रम 'संडेज् ऑन सायकल' मोहिमेचे नेतृत्व केले. डॉक्टर्स आणि आरोग्य व्यावसायिक या आठवड्यातील विशेष सहकारी होते, त्यांनी प्रतिबंधक आरोग्याच्या महत्त्वाच्या भूमिकेवर आणि स्थूलतेसारख्या जीवनशैलीशी निगडीत आजारांशी लढण्यासाठी शारीरिक हालचालीचे महत्त्व अधोरेखित केले.

राष्ट्राप्रती त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करताना, डॉ. मांडवीय म्हणाले की, "कोविड काळात आरोग्य मंत्री म्हणून, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे समर्पण जवळून पाहिले आहे. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे आणि तंदुरूस्तीचा मंत्र देणाऱ्या संडेज् ऑन सायकल उपक्रमात त्यांनी सहभाग घेतल्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. मी त्यांना नागरिकांना निरोगी आयुष्याविषयी मार्गदर्शन करण्याचे आवाहन करतो कारण आरोग्यसंबंधात डॉक्टर जे सांगतात तेव्हा लोक त्याचे पालन करतात."
या उपक्रमात सर्व वयोगटातील लोकांनी उत्साहात सहभाग घेतला, तसंच जागतिक पॅरा अँथलेटिक्स अजिंक्यपद पदक विजेते प्रवीण कुमार, सोमन राणा आणि शैलेश कुमार यांनीही नागरिकांना सक्रिय जीवनशैलीसाठी प्रेरणा देण्यासाठी यामध्ये सहभाग नोंदवला.

देशातल्या आघाडीच्या तंदुरूस्ती चळवळींपैकी एक म्हणून संडेज ऑन सायकल निश्चितच मुख्य उपक्रम झाला आहे, याकडे लक्ष वेधताना डॉ. मांडवीय पुढे म्हणाले, "आज भारतातील "10,000हून अधिक ठिकाणी 'संडेज् ऑल सायकल'चे आयोजन कऱण्यात आले असून, तिथे लठ्ठपणाशी लढण्यासाठी डॉक्टर्स या उपक्रमात सामील झाले आहेत. निरोगी शरीर आणि निरोगी मन हेच भक्कम राष्ट्राचा पाया असते. सायकलिंग हा सर्वांत सोपा व्यायाम प्रकार असून, तो कोणालाही करता येतो. तसेच मी प्रत्येकाला त्यांच्या खेळासाठी आणि तंदुरूस्तीच्या व्यायामक्रियांसाठी स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन करतो."
* * *
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2178161)
आगंतुक पटल : 16