पंतप्रधान कार्यालय
अँथ्रोपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारियो अमोदेई यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
11 OCT 2025 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2025
अँथ्रोपिक (Anthropic) या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारियो अमोदेई यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अँथ्रोपिकचा भारतातील विस्तार आणि त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वाढत्या वापरावर चर्चा झाली. विशेषतः क्लॉड कोड या साधनाचा भारतातील वापर जून महिन्यापासून पाचपट वाढल्याचे अधोरेखित करण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांनी भारतातील चैतन्यपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्था तसेच मानव-केंद्रित आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रतिभावान तरुणांच्या अफाट क्षमतेवर प्रकाश टाकला. त्यांनी अँथ्रोपिकच्या विस्ताराचे स्वागत केले. ही भागीदारी शिक्षण, आरोग्यसेवा आणि कृषी अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतांना आणखी बळकटी देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
अमोदेई यांनी भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणावरील सक्रिय आणि दूरदर्शन दृष्टिकोनाचे कौतुक केले, आणि समावेशक विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भारत आणि दिलेला भर प्रशंसनीय असल्याचे नमूद केले.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;
"तुम्हाला भेटून आनंद झाला. भारताची चैतन्यपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्था आणि प्रतिभावान तरुण मानव-केंद्रित आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेषाला चालना देत आहेत. आम्ही अँथ्रोपिकच्या विस्ताराचे स्वागत करतो आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात एकत्रितपणे काम करण्यास उत्सुक आहोत.
@DarioAmodei”
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178029)
Visitor Counter : 4
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam