पंतप्रधान कार्यालय
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली
संपूर्ण भारतात सामाजिक-राजकीय जागृती घडवण्यात लोकनायक जेपी यांच्या भूमिकेचे पंतप्रधानांनी केले स्मरण
आणीबाणीच्या काळात लिहिलेल्या लोकनायक जेपींच्या 'प्रिझन डायरी'मधील दुर्मिळ पाने पंतप्रधानांनी केली सामायिक
Posted On:
11 OCT 2025 11:06AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. भारतातील सर्वात निर्भय आणि विवेकी आवाज उठविणाऱ्यांपैकी एक, तसेच लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठीचे अथक समर्थक अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचे वर्णन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की लोकनायक जेपी यांनी सामान्य नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि संवैधानिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. संपूर्ण क्रांतीच्या त्यांच्या आवाहनाने समानता, नीतिमत्ता आणि सुशासनावर आधारित राष्ट्राची कल्पना करणाऱ्या सामाजिक चळवळीला चालना मिळाली.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चिरस्थायी वारशाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी नमूद केले की त्यांनी बिहार आणि गुजरातमध्ये अनेक लोक चळवळींना प्रेरणा दिली, ज्यामुळे संपूर्ण भारतात सामाजिक-राजकीय जागृती झाली. या चळवळींनी केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारला हादरवून टाकले, ज्याने आणीबाणी लादली आणि संविधान पायदळी तुडवले होते, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले.
लोकनायक जेपी यांच्या जयंतीदिनी, त्यांच्या 'प्रिझन डायरी' या पुस्तकातील संग्रहातील काही दुर्मिळ पानेसुद्धा पंतप्रधानांनी सामायिक केली, जी आणीबाणीच्या काळात लिहिली गेली होती. पंतप्रधान म्हणाले की हे पुस्तक जेपींच्या एकाकी कारावासातील व्यथा आणि लोकशाहीवरील त्यांचा अखंड विश्वास व्यक्त करते. लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे उद्धरण देत पंतप्रधानांनी त्यांच्या अर्थपूर्ण शब्दांवर प्रकाश टाकला: "भारतीय लोकशाहीच्या शवपेटीत ठोकलेला प्रत्येक खिळा जणू काही माझ्या हृदयात ठोकला गेला आहे."
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टच्या मालिकेत म्हटले आहे की;
"भारतातील सर्वात निर्भय आणि विवेकी आवाज उठविणाऱ्यांपैकी एक, तसेच लोकशाही आणि सामाजिक न्यायाचे अथक समर्थक लोकनायक जेपी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली." "लोकनायक जेपी यांनी आपले जीवन सामान्य नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि संवैधानिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी समर्पित केले. संपूर्ण क्रांतीच्या त्यांच्या आवाहनाने एक सामाजिक चळवळ पेटवली, ज्यामध्ये समानता, नीतिमत्ता आणि सुशासनावर आधारित राष्ट्राची कल्पना आली. त्यांनी अनेक लोक चळवळींना प्रेरणा दिली, विशेषतः बिहार आणि गुजरातमध्ये, ज्यामुळे संपूर्ण भारतात सामाजिक-राजकीय जागृती झाली. या चळवळींनी आणीबाणी लादणाऱ्या आणि आपले संविधान पायदळी तुडविणाऱ्या केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारला हादरवून टाकले."
“लोकनायक जेपी यांच्या जयंतीनिमित्त, संग्रहातील एक दुर्मिळ झलक... आणीबाणीच्या काळात लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकातील, प्रिझन डायरीतील काही पाने येथे देत आहे.
आणीबाणीच्या काळात लोकनायक जेपींनी अनेक दिवस एकांतवासात घालवले. त्यांची प्रिझन डायरी त्यांची व्यथा आणि लोकशाहीवरील अखंड विश्वास व्यक्त करते.
"भारतीय लोकशाहीच्या शवपेटीत ठोकलेला प्रत्येक खिळा जणू काही माझ्या हृदयात ठोकला गेला आहे", असे त्यांनी लिहिले.
* * *
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177716)
Visitor Counter : 8
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam