दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) 2025 या आशियातील प्रमुख दूरसंचार आणि तंत्रज्ञान कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन


केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी यशोभूमी येथे इंडिया मोबाइल काँग्रेस 2025 च्या तयारीचा घेतला आढावा

नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे 8-11 ऑक्टोबर दरम्यान आयएमसी 2025 चे आयोजन

Posted On: 06 OCT 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी आज यशोभूमी, द्वारका येथील इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) 2025 स्थळाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर 2025 रोजी आयएमसी 2025 चे उद्घाटन होणार असून त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सिंधिया यांनी नवी दिल्लीतील शिवाजी स्टेडियमपासून विमानतळ मेट्रोमधून कार्यक्रमस्थळाला भेट दिली आणि पुन्हा परतीचा प्रवास केला.

  

या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी प्रदर्शन परिसराची विस्तृत पाहणी केली , सहभागी स्टार्टअप्स आणि प्रदर्शकांशी संवाद साधला आणि दूरसंचार विभाग , सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि भागीदार संस्थांच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकांचे अध्यक्षपद भूषवले.  त्यांनी माध्यमांना संबोधित करताना आयएमसी  2025 ची व्याप्ती, महत्त्वाकांक्षा आणि जागतिक महत्त्व स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले की, आयएमसी 2025 कनेक्टिव्हिटीसाठी एक नवीन आदर्श निर्माण करेल,ज्यामध्ये दूरसंचार हा 5G, एआय, एमएल, आयओटी आणि उपग्रह संप्रेषण यासारख्या तंत्रज्ञानासाठी महामार्ग आणि पथदर्शक बनेल जो केवळ भारतालाच जोडणार नाही  तर भारताला संपूर्ण जगाशी जोडेल. ते पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान  सक्षमीकरणाची ही कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अकरा वर्षांमध्ये काळजीपूर्वक आखलेली रणनीती होती , ज्याचा उद्देश आत्मनिर्भर, सक्षम आणि नवोन्मेषी  भारत निर्माण करणे होता जो जागतिक प्रगतीला चालना देईल.

  

या वर्षीच्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये यशोभूमी येथे 150 हून अधिक देशांमधून 1.5 लाखांहून अधिक अभ्यागत, 7,000 प्रतिनिधी आणि सहभागी येणार आहेत, तसेच 4.5 लाख चौरस फूट क्षेत्रात 400 प्रदर्शक भाग घेतील. केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी सांगितले की, आयएमसी एक राष्ट्रीय मंच राहिला नसून "डिजिटल क्षेत्रात भारताची वाढती क्षमता आणि नेतृत्व प्रतिबिंबित करणारी आशियाई आणि जागतिक तंत्रज्ञान परिषद " बनली आहे.

 

Follow DoT Handles for more: -

X - https://x.com/DoT_India

Insta-  https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==

Fb - https://www.facebook.com/DoTIndia

Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175493) Visitor Counter : 6