पंतप्रधान कार्यालय
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
Posted On:
05 OCT 2025 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानी आणि व्यापक नुकसानाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या कठीण काळात नेपाळची जनता आणि नेपाळ सरकारप्रती भारताच्या ठाम समर्थनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मोदी यांनी या संकटात आवश्यक त्या सर्व मदतीसाठी भारताची बांधिलकी अधोरेखित करत, भारत संकट काळात एक मित्रवत शेजारी आणि प्रथम प्रतिसाद देणारे राष्ट्र असल्याचे स्पष्ट केले.
सामाजिक संपर्क माध्यम ‘एक्स’वरील आपल्या एका संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेली जीवितहानी आणि नुकसान दुःखद आहे. या कठीण काळात आम्ही नेपाळची जनता आणि सरकार समवेत आहोत. एक मित्रवत शेजारी आणि प्रथम प्रतिसाद देणारे राष्ट्र म्हणून भारत आवश्यक मदत देण्यास वचनबद्ध आहे.”
* * *
निलिमा चितळे/नितिन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175164)
Visitor Counter : 3
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam