अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 4 ऑक्टोबर 2025 रोजी गुजरातमधील गांधीनगर इथून “आपकी पूँजी, आपका अधिकार (“तुमचा पैसा, तुमचा हक्क”) या बेहिशेबी आर्थिक मालमत्तेच्या विरोधातील राष्ट्रव्यापी जागरूकता मोहिमेची सुरुवात करणार
Posted On:
01 OCT 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2025
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा वित्तीय सेवा विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI), भारतीय विनिमय आणि रोखे महामंडळ (SEBI) आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (IEPFA) यांच्या समन्वयाने, “आपकी पूँजी, आपका अधिकार” — तुमचा पैसा, तुमचा अधिकार ही देशव्यापी जागरूकता मोहीम सुरू करणार आहे. वित्तीय क्षेत्रातील हक्क न सांगितलेल्या मालमत्तेच्या संदर्भात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत ही मोहीम राबवली जाईल.
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन 4 ऑक्टोबर 2025 रोजी गुजरातमधील गांधीनगर इथून या मोहिमेचे उद्घाटन करतील.
विमा पॉलिसीचे दावे, बँक ठेवी, लाभांश, शेअर्स आणि म्युच्युअल फंडाच्या उत्पन्नासह दावा न केलेल्या आर्थिक मालमत्ता, बहुतेकदा माहितीच्या अभावामुळे किंवा कालबाह्य खात्याच्या तपशीलांमुळे तशाच राहतात. या मोहिमेदरम्यान, नागरिकांना त्यांच्या हक्क नसलेल्या मालमत्तेचा शोध कसा घ्यावा, रेकॉर्ड कसे अपडेट करावे आणि दाव्याची प्रक्रिया कशी पूर्ण करावी याबद्दल प्रत्यक्ष त्याच ठिकाणी मार्गदर्शन केले जाईल. या दरम्यान टप्प्या टप्प्याने डिजिटल साधने आणि प्रात्यक्षिके देखील सादर केली जातील.
नागरिकांनी वाचवलेल्या प्रत्येक रुपयावर त्यांचे कायदेशीर वारस आणि नामनिर्देशित व्यक्तीच हक्क सांगतील याची खात्री करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. ही मोहीम नागरिकांना सक्रिय सहभाग घेण्यासाठी, जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी आणि प्रत्येक कुटुंबात आर्थिक समावेशन बळकट करण्याच्या कार्यात प्रेरणा देईल. संबंधित निधी नियामकांनी विकसित केलेल्या मानक कार्यपद्धती (SOPs) आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) यांच्या आधारे, प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक बनवण्यासाठी, नागरिकांना त्यांचे हक्काचे पैसे कसे शोधायचे आणि कसे मिळवायचे याबद्दल स्पष्ट माहिती देऊन सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यासह बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आणि पेन्शन संस्थांचे स्टॉल असलेले एक विशेष आर्थिक समावेशन प्रदर्शन देखील आयोजित केले जाईल.
* * *
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2173944)
Visitor Counter : 6