संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सच्या महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला

Posted On: 01 OCT 2025 4:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2025

 

लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी 1 ऑक्टोबर 2025  रोजी लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांच्या जागी राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना असलेल्या एनसीसीने 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपल्या कॅडेटची संख्या 20 लाखांपर्यंत वाढवली आहे, अशा एका महत्त्वाच्या टप्प्यावर ते पदभार स्वीकारत आहेत. एकता आणि शिस्त या आपल्या ध्येयवाक्यासह, एनसीसी विकसित भारत@2047 च्या बरोबरीने विकसित होत आहे, चारित्र्य निर्मिती आणि देशभक्तीवर लक्ष केंद्रित करून नवोपक्रम, डिजिटल कौशल्ये आणि जागतिक जागरूकता यात भर घालत आहे.

17  डिसेंबर 1988  रोजी भारतीय सैन्याच्या 19  कुमाओं रेजिमेंटमध्ये नियुक्त झालेले लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी 37  वर्षांची विशिष्ट सेवा बजावली आहे. त्यांनी बंडखोरीविरोधी आणि दहशतवादविरोधी वातावरणात आव्हानात्मक कामगिरी केली आहे आणि अरुणाचल प्रदेश, काश्मीर खोरे आणि लष्करी मुख्यालयात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकातील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेअंतर्गत एका इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्वही केले. या नियुक्तीपूर्वी ते वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये कमांडंट होते.

 

* * *

सोनल तुपे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2173694) Visitor Counter : 9