वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक खरेदीत पारदर्शकता व नैतिक व्यवहार पध्दतींना प्रोत्साहन देण्यासाठी जीईएम कडून सतर्कता जागरूकता सप्ताह मोहीम सुरू

Posted On: 25 SEP 2025 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2025

 

सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम) ने “जीईएम की सुनिएँ, सतर्क रहें, जिम्मेदार बनें” या शीर्षकाखाली सतर्कता जागरूकता सप्ताहानिमित्त विशेष मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकता आणि नैतिक पद्धतींचे पालन करण्याच्या वचनबद्धतेला हा दुजोरा आहे.

ही मोहीम सर्वसमावेशक जागरूकता व शैक्षणिक उपक्रम म्हणून राबवली जात असून खरेदीदारांना सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास, नियमांचे पालन करण्यास आणि जीईएमच्या  अंतर्निहित सुरक्षा उपायांचा लाभ उठवण्यास प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. त्याचबरोबर विक्रेत्यांना—विशेषतः शेवटच्या टप्प्यातील उद्योजक, स्टार्टअप्स आणि टियर-2 व टियर-3 शहरांतील सूक्ष्म व लघु उद्योगांना—पारदर्शक, सुरक्षित आणि नियमसंगत संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जीईएम वरील व्यवहार सुरक्षित, न्याय्य आणि विश्वासार्ह राहावेत यासाठी रेड-फ्लॅग अलर्ट्स, संरचित बोली अटी आणि पारदर्शक लेखापरीक्षण प्रणाली यांसारखे सक्षम सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून जीईएम ने विविध व्यावसायिक समुदायांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी स्थानिक भाषांमधील प्रसार मोहिमेची सुरुवात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून केली आहे. यामुळे देशाच्या दुर्गम भागांतील उद्योजकांनाही सार्वजनिक खरेदी प्रक्रियेत आत्मविश्वासाने सहभागी होता येईल.

जीईएम #व्होकलफॉरलोकल अंतर्गत आठ विशेष आउटलेट्स आणि स्टार्टअप्स, स्वयं-सहायता गट (एसएचजी), कारागीर, विणकर आणि एफपीओ साठी निवडक बाजारपेठ पृष्ठांद्वारे संधी विस्तारत आहे. प्रगत महसूल धोरणांतर्गत 97 टक्के ऑर्डर्सना व्यवहार शुल्कातून सूट देण्यात आली आहे तसेच नव्या विक्रेत्यांसाठी अनामत रक्कम  ठेवण्याची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील सूक्ष्म, लघु उद्योगांना सहभाग अधिक सोपा, समावेशक आणि परवडणारा झाला आहे.

 

* * *

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2171291) Visitor Counter : 15