खाण मंत्रालय
भारताचे राष्ट्रपती 26 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार 2024 करणार प्रदान
Posted On:
25 SEP 2025 2:40AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात प्रतिष्ठित राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार (एजीए) 2024 प्रदान करतील. या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी आणि राज्य मंत्री सतीशचंद्र दुबे यांचीही उपस्थिती असेल.
1966 मध्ये भारत सरकारच्या खाण मंत्रालयाद्वारे स्थापित, राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार (2009 पर्यंत ‘राष्ट्रीय खनिज पुरस्कार’ या नावाने ओळखले जात होते) हे भू-विज्ञान क्षेत्रातील देशातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक मानले जातात.
या पुरस्कारांचे उद्दिष्ट भू-विज्ञान क्षेत्रातील खनिज शोध व अन्वेषण, खाण तंत्रज्ञान व खनिज लाभ प्रक्रिया, मूलभूत व अनुप्रयुक्त भूविज्ञान यामधील असामान्य कामगिरी व उल्लेखनीय योगदानाबद्दल व्यक्ती आणि संघटनांना गौरवणे हे आहे. हे पुरस्कार खाण मंत्रालयामार्फत दरवर्षी खालील तीन गटांमध्ये प्रदान केले जातात:
(i) राष्ट्रीय भू-विज्ञान जीवनगौरव पुरस्कार
(ii) राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार
(iii) राष्ट्रीय युवा भू-वैज्ञानिक पुरस्कार
2024 साठी मंत्रालयाकडे या तीन श्रेणींमध्ये एकूण 208 नामनिर्देशन प्राप्त झाले होते. तीन टप्प्यांतील काटेकोर निवड प्रक्रियेनंतर 12 पुरस्कार निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 9 वैयक्तिक व 3 संघ पुरस्कारांचा समावेश आहे. एकूण 20 भू-विज्ञान तज्ज्ञांना हे 12 राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार राष्ट्रपतींकडून प्रदान केले जातील.
राष्ट्रीय भू-विज्ञान जीवनगौरव पुरस्कार
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (एनएसए) वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रो. श्याम सुंदर राय, अतिथी प्राध्यापक, आयआयएसईआर पुणे यांना त्यांच्या भू-विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
राष्ट्रीय युवा भू-विज्ञान पुरस्कार
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे (जीएसआय), वरिष्ठ भूवैज्ञानिक, सुसोभन नियोगी, यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात येईल.
या पुरस्कार वितरण समारंभास देशभरातील प्रख्यात भूविज्ञानी, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2024 च्या सर्व पुरस्कार विजेत्यांची यादी खाली दिली आहे:
राष्ट्रीय भू-विज्ञान जीवनगौरव पुरस्कार 2024 (एक पुरस्कार)
प्रो. श्याम सुंदर राय
आयएनएसए, वरिष्ठ शास्त्रज्ञ,
अतिथी प्राध्यापक,पुणे येथील आयआयएसईआर,
राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार 2024 (10 पुरस्कार)
विभाग I: खनिज शोध व अन्वेषण (3 पुरस्कार)
श्रेणी (i): आर्थिक व धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या खनिजांचे अन्वेषण (इंधनांशिवाय) आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर (2 पुरस्कार)
- भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) चमू: (सांघिक पुरस्कार)
- हरमन महंता, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
- उत्पल कुमार दास, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
- श्याम कुमार संगमरेड्डी, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
- साई कुमार समाला, भूवैज्ञानिक
- भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) चमू: (सांघिक पुरस्कार)
- नवजित सिंग नय्यर, संचालक,
- अमित कुमार, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
- त्रिप्ती बाबा, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
- संदीप कुमार, भूवैज्ञानिक
श्रेणी (ii): कोळसा, लिग्नाइट व कोळसा शय्या मिथेन इ. इंधनसंपत्तींचे शोध व अन्वेषण (1 पुरस्कार)
- जीएसआय चमू:* (सांघिक पुरस्कार)
- श्रद्धांजली सुभद्रशिनी, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
- सुप्रिया चक्रवर्ती, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
- जयदीप मुखर्जी, संचालक
विभाग II: खाण तंत्रज्ञान, खनिज लाभन व शाश्वत खनिज विकास (2 पुरस्कार)
श्रेणी (iii): खाण तंत्रज्ञान आणि खाण क्षेत्रातील नवीन तंत्रांचा विकास (1 पुरस्कार), (वैयक्तिक पुरस्कार)
डॉ. जय कृष्ण पांडे
मुख्य शास्त्रज्ञ,
सीएसआयआर – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अॅण्ड फ्युएल रिसर्च, धनबाद
श्रेणी (iv): खनिज लाभन व शाश्वत खनिज विकास (1 पुरस्कार), (वैयक्तिक पुरस्कार)
डॉ. रंजीत कुमार सिंग
मुख्य शास्त्रज्ञ,
सीएसआयआर – नॅशनल मेटलर्जिकल लॅबोरेटरी, जमशेदपूर
विभाग III: मूलभूत भूविज्ञान (2 पुरस्कार)
श्रेणी (v): मूलभूत भूविज्ञान आणि महासागर विकास व संबंधित क्षेत्रे (2 पुरस्कार), (वैयक्तिक पुरस्कार)
- डॉ. वेदुला वेंकटरत्न सुब्रमण्य श्रीनिवास शर्मा
मुख्य शास्त्रज्ञ, सीएसआयआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी,
प्रादेशिक केंद्र, विशाखापट्टणम
- डॉ. मेकला राम मोहन
मुख्य शास्त्रज्ञ, सीएसआयआर – नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, हैदराबाद
विभाग IV: अनुप्रयुक्त भूविज्ञान (3 पुरस्कार)
श्रेणी (vi): अभियंता भूविज्ञान, भू-पर्यावरणीय अभ्यास, भूजल इ. (1 पुरस्कार), (वैयक्तिक पुरस्कार)
प्रो. गुलाम जीलानी
प्राध्यापक, पृथ्वी विज्ञान विभाग
आणि अधिष्ठाता, शाळा पृथ्वी व पर्यावरणीय विज्ञान,
काश्मीर विद्यापीठ
श्रेणी (vii): अनुप्रयुक्त भूभौतिकशास्त्र व संशोधन (1 पुरस्कार), (वैयक्तिक पुरस्कार)
प्रो. संजीत कुमार पाल
प्राध्यापक व प्रमुख, अनुप्रयुक्त भूभौतिकशास्त्र विभाग,
आयआयटी (आयएसएम), धनबाद
श्रेणी (viii): नैसर्गिक आपत्ती संशोधन (भूकंप, भूस्खलन, पूर, सुनामी इ.) (1 पुरस्कार), (वैयक्तिक पुरस्कार)
प्रो. मुकत लाल शर्मा
प्राध्यापक, भूकंप अभियांत्रिकी विभाग
व प्रमुख, आंतरराष्ट्रीय जलाशय उत्कृष्टता केंद्र,
आयआयटी-रुड़की
राष्ट्रीय युवा भूविज्ञानी पुरस्कार 2024 (एक पुरस्कार)
सुसोभन नियोगी
वरिष्ठ भूवैज्ञानिक,
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय)
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2171119)
Visitor Counter : 29