गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांच्या हस्ते जोधपूर येथे 'श्री पारसमल बोहरा दृष्टीहीन महाविद्यालय' आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या इमारतीची पायाभरणी संपन्न
प्रविष्टि तिथि:
21 SEP 2025 7:27PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांच्या हस्ते आज राजस्थानमधील जोधपूर येथे श्री पारसमल बोहरा दृष्टिहीन महाविद्यालय' आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिह शेखावत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणामध्ये, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, जेव्हा एखादी व्यक्ती आपले आयुष्य सेवेसाठी विशेषतः दिव्यांगांसाठी समर्पित करते, तेव्हा ते आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. ते म्हणाले की, दिव्यांगांना देवाने अद्वितीय शक्ती बहाल केलेली असते आणि ही ताकद ओळखून त्यांचे जीवन सुलभ करण्याच्या प्रयत्नांची प्रेरणा हजारो लोकांनी सुशीलाजींच्या जीवनातून आपलीशी केली आहे.

अमित शाह म्हणाले की, 15 कोटी रुपये मूल्याच्या तीन प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. संस्थेच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आलेख पाहता, हे तीनही प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होतील आणि शेकडो मुलांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणतील. सुशीलाजींनी पाच शाळा, दोन महाविद्यालये, निशुल्क वसतिगृह, जेवण, ऑडिओ पुस्तके, ध्वनिमुद्रित केलेली व्याखाने, ब्रेल छपाई कारखाना, स्क्रीन रीडर, संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यांच्या माध्यमातून शेकडो दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञान आणि दृष्टीचा प्रकाश पसरवला आहे, ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली.
***
शैलेश पाटील / विजयालक्ष्मी साळवी-साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2169370)
आगंतुक पटल : 23