पंतप्रधान कार्यालय
गुरु गोविंद सिंह जी आणि माता साहिब कौर जी यांच्या अत्यंत पवित्र आणि अनमोल पावन ‘जोरे साहिब’चे सुरक्षितपणे जतन आणि योग्य प्रदर्शनाच्या संदर्भात सूचना देण्यासाठी आलेल्या शीख प्रतिनिधी मंडळाच्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय सदस्यांची पंतप्रधानांनी भेट घेतली
Posted On:
19 SEP 2025 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शीख प्रतिनिधी मंडळाच्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय सदस्यांची भेट घेऊन गुरु गोविंद सिंह जी आणि माता साहिब कौर जी यांच्या अत्यंत पवित्र आणि अनमोल पावन ‘जोरे साहिब’चे सुरक्षितपणे जतन आणि योग्य प्रदर्शनाच्या संदर्भात त्यांनी दिलेले निवेदन स्वीकारले. पंतप्रधान मोदी म्हणाले की पवित्र अवशेष जितके महत्त्वाचे आणि अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत तसेच ‘जोरे साहिब’ देखील वैभवशाली शीख इतिहासाचा भाग आहेत आणि तितकेच ते आपल्या देशाच्या सांस्कृतिक मूल्यांचे देखील प्रतीक आहेत. “हे पवित्र अवशेष येणाऱ्या पिढ्यांना गुरु गोविंद सिंहजींनी दाखवलेल्या धैर्य, प्रामाणिकपणा, न्याय आणि सामाजिक एकोप्याच्या मार्गावरून चालण्यासाठी प्रेरित करतील,”पंतप्रधान पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या x पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले:
“शीख प्रतिनिधी मंडळाच्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय सदस्यांची भेट घेऊन मला आनंद झाला. या सदस्यांनी गुरु गोविंद सिंह जी आणि माता साहिब कौर जी यांच्या अत्यंत पवित्र आणि अनमोल पावन ‘जोरे साहिब’चे सुरक्षितपणे जतन आणि योग्य प्रदर्शनाच्या संदर्भात निवेदन दिले.
पवित्र अवशेष जितके महत्त्वाचे आणि अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत तसेच ‘जोरे साहिब’ देखील वैभवशाली शीख इतिहासाचा भाग आहेत आणि तितकेच ते आपल्या देशाच्या सांस्कृतिक मूल्यांचे देखील प्रतीक आहेत.
हे पवित्र अवशेष येणाऱ्या पिढ्यांना गुरु गोविंद सिंहजींनी दाखवलेल्या धैर्य, प्रामाणिकपणा, न्याय आणि सामाजिक एकोप्याच्या मार्गावरून चालण्यासाठी प्रेरित करतील.”
निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168687)
अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam