पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली
प्रविष्टि तिथि:
16 SEP 2025 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोदी यांना दूरध्वनी करून त्यांना शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. “तुमच्याप्रमाणेच मी देखील भारत-अमेरिका सर्वसमावेशक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याप्रती संपूर्णपणे वचनबद्ध आहे. युक्रेन संघर्ष शांततेने सोडवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या उपक्रमांना आमचा पाठींबा आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात मोदी म्हणतात:
“माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तुम्ही दूरध्वनी करून माझ्या 75 व्या वाढदिवसानिमित्त स्नेहपूर्ण शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच मी देखील भारत-अमेरिका सर्वसमावेशक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याप्रती संपूर्णपणे वचनबद्ध आहे. युक्रेन संघर्ष शांततेने सोडवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या उपक्रमांना आमचा पाठींबा आहे.”
@POTUS
@realDonaldTrump
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2168444)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam