पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिल्या शुभेच्छा
युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार
या वर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात स्वागत करण्यास पंतप्रधानांनी दर्शविली उत्सुकता
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2025 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांना 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी त्यांच्या शुभेच्छा आणि निरंतर मैत्रीबद्दल मनापासून आभार व्यक्त केले.
23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय विषयसूचीवरील विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी सांगितले की, या वर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात स्वागत करण्यास आपण उत्सुक आहोत.
युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
दोन्ही नेत्यांनी निकट संपर्कात राहण्यास सहमती दर्शविली.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2167856)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam