पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी ओम बिर्ला यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मानले आभार

Posted On: 17 SEP 2025 12:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2025

 

​आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्याबद्दल ​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले आहेत. आपल्या अशा प्रेमामुळेच आपल्याला सदैव देशसेवेचे कार्य करत राहण्याची प्रेरणा मिळत असते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

​यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश:

शुभेच्छांसाठी आपले खूप खूप आभार @ombirlakota जी. देशवासियांचे कल्याण आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या कामात आमचे सरकार प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाही. आपल्या या प्रेमामुळेच तर, मला सदैव देशसेवेचे कार्य करत राहण्याची प्रेरणा मिळत असते.

 

* * *

सोनल तुपे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2167511) Visitor Counter : 2