शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर 2025-26 या वर्षासाठी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याला 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ
Posted On:
16 SEP 2025 12:49PM by PIB Mumbai
2025-26 या वर्षासाठी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप योजनेसाठी (एनएमएमएसएस) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) वर गुणवंत विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
एनएसपी हे पोर्टल 2 जून 2025 पासून विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी खुले करण्यात आले आहे. प्रकल्प वर्ष 2025-26 मध्ये, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एनएसपीवर एकदाच नोंदणी (ओटीआर) करावी लागेल, त्यानंतर त्यांना आपल्या निवडलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करावा लागेल. एनएसपीवर नोंदणीसाठी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे (FAQ) पुढील संकेतस्थळावर मिळू शकतील https://scholarships.gov.in/studentFAQs.
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने राबविलेल्या 'नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप योजने'द्वारे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राथमिक स्तरावरील, म्हणजेच आठवी इयत्तेनंतर शाळा सोडण्याचे प्रमाण रोखण्यासाठी आणि उच्च माध्यमिक स्तरावर, म्हणजेच त्यांना बारावीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या नववीच्या एक लाख नवीन विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर आधारित दहावी ते बारावीपर्यंत नूतनीकरण पद्धतीने ही शिष्यवृत्ती सुरू ठेवली जाते. ही योजना फक्त राज्य सरकार, सरकारी अनुदानित आणि स्थानिक संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू आहे आणि शिष्यवृत्तीची रक्कम प्रति विद्यार्थी वार्षिक 12000 रुपये आहे.
पात्र अर्जदारांकडून 30.08.2025 पर्यंत 85420 नवीन आणि 172027 नूतनीकरणासाठी अर्ज सादर केले गेले आहेत.
***
SushamaKane/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167133)
Visitor Counter : 2