संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धा - THINQ 2025ला उत्स्फूर्त प्रतिसाद
Posted On:
12 SEP 2025 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025
भारतीय नौदलाच्या राष्ट्रीय स्तरावरील THINQ 2025 या प्रश्न मंजूषेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण भारतातील 35,470 संघांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे.
इयत्ता 10 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने युवकांना बौद्धिकदृष्ट्या आव्हान देण्यासाठी ही प्रश्न मंजूषा तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय नौदलाचे जीवन, परंपरा आणि मूलभूत मूल्यांबद्दल देखील ही माहिती प्रदान करते.
या प्रश्न मंजूषेला 10 जून 25 रोजी नोंदणी प्रक्रियेने सुरुवात झाली. या भरभरून मिळालेल्या सहभागामुळे देशभरातील विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या प्रतिष्ठित कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी असलेली उत्सुकता आणि उत्साह दिसून येतो.
सध्या एलिमिनेशन/बाद फेऱ्या सुरू आहेत ज्यामध्ये शाळा उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. एलिमिनेशन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर, सर्वोत्तम कामगिरी करणारे 16 संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत जातील. उपांत्य फेरी आणि अंतिम सामने अनुक्रमे 13 आणि 14 नोव्हेंबर 25 रोजी केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदलाच्या प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेत, भारतीय नौदल अकादमीमध्ये आयोजित केले जातील.
भारतीय नौदलाने सर्व सहभागी शालेय संघांना,आव्हानात्मक क्विझ स्पर्धेसाठी , THINQ 2025 साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुषमा काणे/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166102)
Visitor Counter : 2