महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला व बालविकास मंत्रालयाने सामाजिक, कल्याणकारी व सुरक्षा क्षेत्रातील सुधारणा उपाययोजनांचा शोध घेण्यासाठी चर्चात्मक कार्यशाळा आयोजित केली

Posted On: 10 SEP 2025 2:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2025 

महिला व बालविकास मंत्रालयाने सामाजिक, कल्याणकारी व सुरक्षा क्षेत्रातील सुधारणा उपाययोजनांचा शोध घेण्यासाठी 9 सप्टेंबर रोजी चर्चात्मक कार्यशाळा आयोजित केली.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्र्याचे सचिव अनिल मलिक होते. या कार्यशाळेत सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी सक्रिय सहभागी झाले होते.

‘मिशन सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0’ - पोषण तसेच  बालकांचे पालन व शिक्षण (ECCE) अंमलबजावणी, ‘मिशन शक्ती’ - महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरण, आणि ‘मिशन वात्सल्य’ - बालकांचा सर्वंकष विकास व सुरक्षितता  यांच्यामधील सुधारणांवर कार्यशाळेतील चर्चांचा भर होता.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांनी महिला व बालक केंद्रित प्रगतीसंबंधित कायदेविषयक, धोरणात्मक, प्रक्रियागत व संस्थात्मक सुधारणा  समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने अनेक बहुमूल्य सूचना केल्या.

महिला व बालविकास मंत्रालयाच्या सहकार्यपूर्ण सुधारणा उपाययोजना, प्रयत्नांचा मिलाफ व समुदायाच्या सहभागाद्वारे महिला व बालकांना प्राथमिकता देण्याच्या वचनबद्धतेला या कार्यशाळेमुळे पुष्टी मिळाली.

सुषमा काणे/उमा रायकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165243) Visitor Counter : 2