पंतप्रधान कार्यालय
नवीनतम जीएसटी सुधारणांचा भारताच्या उत्पादन क्षेत्रावर होणारा परिवर्तनकारी परिणाम पंतप्रधानांनी केला अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2025 10:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनतम जीएसटी सुधारणांचा भारताच्या उत्पादन क्षेत्रावर होणारा परिवर्तनकारी परिणाम आज अधोरेखित केला. #NextGenGST उपक्रमाद्वारे सुलभीकृत कर श्रेणी, सुव्यवस्थित डिजिटल नियमावली आणि खर्चात बचत करणाऱ्या पद्धतीची सुरुवात होत असून त्यायोगे देशांतर्गत उत्पादन आणि स्पर्धात्मकता यांना लक्षणीयरित्या चालना मिळणार आहे.
एक्स मंचावर प्रकाश दादलानी यांनी लिहिलेल्या एका संदेशाला प्रतिसाद देताना, पंतप्रधान मोदी लिहितात:
“#NextGenGST हे उत्पादकांसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरणार आहे. 5% आणि 18%च्या सुलभीकृत कर श्रेणींसह कच्च्या मालाला येणारा कमी खर्च, डिजिटल पद्धतीने नियमांचे वेगवान पालन आणि वाढती मागणी यामुळे ‘भारतात निर्मित’ उत्पादनांना मोठी चालना मिळेल.”
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164019)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam