पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट
Posted On:
03 SEP 2025 8:40PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल यांची भेट घेतली. "भारत आणि जर्मनी या वर्षी धोरणात्मक भागीदारीची 25 वर्षे साजरी करत आहेत. चैतन्यपूर्ण लोकशाही आणि आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून, आम्हाला व्यापार, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शाश्वतता, उत्पादन आणि गतिशीलता या क्षेत्रात परस्पर लाभदायक सहकार्य वाढवण्याची मोठी क्षमता दिसते", असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल यांच्या भेटीमुळे आनंद झाला. भारत आणि जर्मनी या वर्षी धोरणात्मक भागीदारीची 25 वर्षे साजरी करत आहेत. चैतन्यपूर्ण लोकशाही आणि आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून, आम्हाला व्यापार, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शाश्वतता, उत्पादन आणि गतिशीलता या क्षेत्रात परस्पर लाभदायक सहकार्य वाढवण्याची मोठी क्षमता दिसते. बहुध्रुवीय जग, शांतता आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांप्रति आमचा दृष्टिकोन समान आहे. जर्मन चान्सलरना भारताला लवकर भेटी देण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रण दिले आहे.”
@_FriedrichMerz
***
शैलेश पाटील / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2163552)
Visitor Counter : 2
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam