पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

17% वार्षिक वाढीसह मॉईल ने ऑगस्ट मध्ये नोंदवले सर्वोत्तम उत्पादन

Posted On: 03 SEP 2025 11:32AM by PIB Mumbai

 

मॉईल ने ऑगस्ट 2025 मध्ये 1.45 लाख टन इतके सर्वाधिक उत्पादन गाठून आपल्या कामगिरीची गती कायम ठेवली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत (CPLY) उत्पादनात 17% वाढ नोंदविण्यात आली आहे.

विक्रीच्या बाबतीत, कंपनीने ऑगस्ट 2025 मध्ये 1.13 लाख टन विक्रीसह उत्कृष्ट कामगिरी केली. यातून वर्ष दर वर्ष आधारावर झालेली 25.6% इतकी  उल्लेखनीय वाढ दिसून येते. पुढे, एप्रिल-ऑगस्ट 2025 दरम्यान, मॉईल ने 7.92 लाख टन उत्पादन (वर्ष दर वर्ष 9.3 % वाढ) आणि 50,621 मीटर एक्सप्लोरेटरी ड्रिलिंग (वर्ष दर वर्ष 8.6 % वाढ) सह आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

या विक्रमी कामगिरीबद्दल मॉईलचे  सीएमडी अजित कुमार सक्सेना यांनी अभिनंदन केले आणि आव्हानात्मक हवामान परिस्थितीतही उत्पादन आणि विक्रीत वाढ साध्य करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले.

***

सोनल तुपे / हेमांगी कुलकर्णी / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163300) Visitor Counter : 3