नौवहन मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत होणाऱ्या इंडिया मेरीटाईम वीकमध्ये सहभागी होऊन ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमला करणार संबोधित": सर्वानंद सोनोवाल
"ब्रह्मपुत्रेसाठी 250 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह दोन लक्झरी क्रूझ जहाजे 2027 पर्यंत येणार:" सर्वानंद सोनोवाल
Posted On:
02 SEP 2025 7:17PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, सागरी आणि जलमार्ग मंत्री (एमओपीएसडब्ल्यू) सर्वानंद सोनोवाल यांनी जाहीर केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत होणाऱ्या 'इंडिया मेरीटाईम वीक'मध्ये सहभागी होतील, जिथे ते ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरममध्ये मुख्य भाषण करतील. गुवाहाटी येथील वॉटर व्हॉयेज नॉर्थईस्ट 2025 परिषदेत बोलताना सोनोवाल यांनी या कार्यक्रमाचे वर्णन "जगासमोर भारताची सागरी ताकद दाखविण्याची एक ऐतिहासिक संधी" असे केले, ज्यामध्ये 100 हून अधिक देश आणि 1,00,000 हून अधिक भागधारकांचा सहभाग अपेक्षित आहे.
या क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन होत असून पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे भारताच्या जागतिक सागरी नेतृत्वाला पुन्हा एकदा पुष्टी मिळेल, असे ते म्हणाले.
सर्वानंद सोनोवाल म्हणाले की, “इंडिया मेरीटाईम वीक केवळ कल्पनांचा संगमच नव्हे तर आत्मविश्वासाचाही संगम असेल, पंतप्रधान मोदींनी आपल्या सागरी दृष्टिकोनाला मार्गदर्शन केल्यामुळे जग आता भारताकडे एक विश्वासार्ह भागीदार आणि उदयोन्मुख सागरी शक्ती म्हणून पाहते. ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरममधील त्यांची उपस्थिती जागतिक उद्योग नेत्यांना भारताच्या विकासाच्या गाथेत गुंतवणूक करण्यास प्रेरित करेल.”
मंत्र्यांनी ईशान्येकडील एका मोठ्या विकासाचा खुलासाही केला: ब्रह्मपुत्रा नदीवर तैनात करण्यासाठी ₹250 कोटींच्या एकत्रित गुंतवणुकीतून दोन लक्झरी क्रूझ जहाजे बांधली जात आहेत. सध्या कोलकाता येथील हावडामधील हुगळी कोचीन शिपयार्डमध्ये बांधकामाधीन असलेल्या या जहाजांचे 2027 मध्ये जलावतरण होईल, ज्यामुळे क्रूझ भारत अभियानाअंतर्गत आसाममधील नदी पर्यटनाला एक नवीन आयाम मिळेल.





***
जयदेवी पुजारी - स्वामी / नंदिनी मथुरे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163262)
Visitor Counter : 2