युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मागविली राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 साठी नामांकने
30 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत
Posted On:
25 AUG 2025 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2025
भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा पुरस्कार (एनवायए) 2024 साठी नामांकने आमंत्रित केली आहेत. या पुरस्काराचे उद्दिष्ट तरुणांना (15 ते 29 वर्षे वयोगटातील) राष्ट्रीय विकास किंवा सामाजिक सेवेच्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रेरित करणे; तरुणांना समुदायाप्रती जबाबदारीची भावना विकसित करण्यास आणि अशा प्रकारे चांगले नागरिक म्हणून त्यांची स्वतःची वैयक्तिक क्षमता सुधारण्यास प्रोत्साहित करणे आणि राष्ट्रीय विकास आणि/किंवा सामाजिक सेवेसाठी तरुणांसोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याला मान्यता देणे हे आहे.
राष्ट्रीय युवा पुरस्कार सर्वसाधारणपणे राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान दिले जातात. हे पुरस्कार दोन श्रेणींमध्ये दिले जातात:
1. वैयक्तिक श्रेणी
2. संस्थात्मक श्रेणी
दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या सामान्यतः वैयक्तिक श्रेणीसाठी 20 आणि संघटना श्रेणीसाठी पाच पेक्षा जास्त नसावी. तथापि पात्रतेच्या बाबतीत मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विवेकबुद्धीनुसार हे प्रमाण बदलू शकते.
व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये पदक, प्रमाणपत्र आणि ₹ 1,00,000/- बक्षीस रक्कम असेल. स्वयंसेवी युवा संघटनांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये पदक, प्रमाणपत्र आणि ₹3,00,000/- बक्षीस रक्कम असेल.
राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 साठी https://awards.gov.in या पोर्टलद्वारे ऑनलाइन नामांकने मागवण्यात आली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात येत आहे. तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आणि पात्रता निकष पोर्टलवर उपलब्ध आहेत.
आरोग्य, संशोधन आणि नवोन्मेष, संस्कृती, मानवाधिकारांचा प्रचार, कला आणि साहित्य, पर्यटन, पारंपरिक औषधे, सक्रिय नागरिकत्व, सामुदायिक सेवा, क्रीडा आणि शैक्षणिक उत्कृष्टता तसेच स्मार्ट लर्निंग यासारखे विकासात्मक उपक्रम आणि सामाजिक सेवेच्या विविध क्षेत्रांमध्ये युवा वर्गासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना त्यांचे नामांकन 30 सप्टेंबर 2025 पर्यंत https://awards.gov.in या पुरस्कार पोर्टलद्वारे सादर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2160536)