संसदीय कामकाज मंत्रालय
राष्ट्रीय ई-विधान ॲप - (नेवा) या डिजिटल मंचामध्ये भाषिक वैविध्य आणण्यासाठी आणखी वैशिष्ट्यांचा समावेश
Posted On:
18 AUG 2025 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2025
राष्ट्रीय ई-विधान ॲप - (नेवा) या डिजिटल मंचामध्ये भाषिक वैविध्य आणण्यासाठी आणखी वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे-
राष्ट्रीय ई-विधान ॲप म्हणजेच नेवा सार्वजनिक पोर्टल (होमपेज आणि राज्यनिहाय विधानसभा पोर्टल) मध्ये भाषिणी अर्थात भाषा इन्टरफेस फॉर इंडिया द्वारे मशीनच्या सहाय्याने सर्व 22 सूचीबद्ध प्रादेशिक भाषांसह इंग्रजीमध्ये टेक्स्ट-टू-टेक्स्ट भाषांतराचे वैशिष्ट्य समाविष्ट करण्यात आले आहे.
संगणक किंवा इतर उपकरणांमध्ये नेटवर्क इंटरफेस, सेटअप आणि व्यवस्थापित करण्याच्या प्रक्रियेत राज्यनिहाय वापरकर्त्यांना त्यांच्या संबंधित प्रादेशिक भाषांमध्ये ॲप्लिकेशनचा वापर करणे शक्य झाले आहे.
डिजिटल बुकमध्ये भाषा टॉगल वैशिष्ट्य उपलब्ध आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना पसंतीनुसार इंटरफेस भाषा बदलता येऊ शकते.
नेवा मंचावर आधीच सक्रिय असलेल्या राज्यांकडे ही वैशिष्ट्ये कार्यरत आहेत.
नेवा अप्लिकेशनच्या सार्वजनिक पोर्टलमध्ये तसेच सदस्य आणि सचिवालय इंटरफेसच्या अनेक घटकांमध्ये भाषिणी द्वारे मशीन-सहाय्यित स्वयंचलित भाषांतर आधीच एकीकृत केले गेले आहे, ज्यामुळे भाषिक सुलभता वाढली आहे.
संसदीय कामकाज आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157536)