भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

पारदर्शक मतदार याद्या लोकशाहीला बळकटी देतात


मतदार यादी तयार करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांचा सहभाग

Posted On: 16 AUG 2025 8:04PM by PIB Mumbai

 

1.   भारतातील संसद आणि विधानसभा निवडणुकांसाठीची निवडणूक प्रणाली ही कायद्याने परिकल्पित केलेली बहुस्तरीय विकेंद्रित रचना आहे.

2.   निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर, एसडीएम-स्तरीय अधिकारी असलेले निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) च्या मदतीने मतदार यादी (ईआर) तयार करतात आणि त्याला अंतिम स्वरूप देतात. ईआरओ आणि बीएलओ मतदार याद्यांच्या अचूकतेची जबाबदारी घेतात.

3.   मतदार याद्यांचा मसुदा प्रकाशित झाल्यावर, त्याच्या डिजिटल आणि भौतिक प्रती सर्व राजकीय पक्षांना दिल्या जातात आणि सर्वांना पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातात. मतदार याद्यांचा मसुदा प्रकाशित झाल्यानंतर, अंतिम मतदार याद्या  प्रकाशित होण्यापूर्वी दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी मतदार आणि राजकीय पक्षांकडे संपूर्ण एक महिन्याचा कालावधी उपलब्ध असतो.

4.   अंतिम मतदार याद्या प्रकाशित झाल्यानंतर, डिजिटल आणि भौतिक प्रती पुन्हा सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांबरोबर सामायिक  केल्या जातात आणि भारत निवडणूक आयोगाच्या  संकेतस्थळावर  प्रकाशित केल्या जातात.

5.   अंतिम मतदार याद्या प्रकाशित झाल्यानंतर, अपीलांची दोन-स्तरीय प्रक्रिया उपलब्ध आहे, ज्यामध्ये पहिले अपील जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे (डीएम) आणि दुसरे अपील प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या सीईओकडे दाखल केले जाऊ शकते.

6.   अत्यंत पारदर्शकता हे कायदा, नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार मतदार यादी तयार करण्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

7.   असे दिसून आले आहे की काही राजकीय पक्ष आणि त्यांचे बूथ लेव्हल एजंट (बीएलए) यांनी योग्य वेळी मतदार याद्यांची तपासणी केली नाही आणि काही त्रुटी आढळून आल्यावर एसडीएम/ ईआरओ, डीईओ किंवा सीईओंच्या निदर्शनास आणून दिल्या नाहीत.

8.   अलीकडे काही राजकीय पक्ष आणि व्यक्ती यापूर्वी तयार केलेल्या मतदार याद्यांसह मतदार याद्यांमधील त्रुटींबाबतचे मुद्दे उपस्थित करत आहेत.

9.   मतदार याद्यांबाबतचा कोणताही मुद्दा उपस्थित करण्याची योग्य वेळ त्या टप्प्यातील दावे आणि हरकती दाखल करण्याच्या कालावधी दरम्यान असावी, हेच सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांबरोबर मतदार याद्या सामायिक   करण्यामागचे उद्दिष्ट आहे. हे मुद्दे योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे  उपस्थित केले असते, तर संबंधित एसडीएम/ईआरओ यांना, त्रुटी जर  खऱ्या असतील तर  निवडणुकांपूर्वी त्या  दुरुस्त करणे शक्य झाले असते.

10. निवडणूक आयोग राजकीय पक्ष आणि कोणत्याही मतदाराद्वारे मतदार याद्यांच्या छाननीचे स्वागत करत आहे. यामुळे एसडीएम / ईआरओना त्रुटी दूर करायला आणि मतदार याद्या पारदर्शक करायला मदत होईल, जे नेहमीच भारत निवडणूक आयोगाचे  उद्दीष्ट राहिले आहे.

***

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2157226)
Read this release in: English , Hindi , Malayalam