राष्ट्रपती कार्यालय
पारशी नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2025 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पारशी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे:
“पारशी नववर्ष नवरोजच्या पवित्र प्रसंगी सर्व नागरिकांना, विशेषतः पारशी बंधू आणि भगिनींना माझ्याकडून स्नेहपूर्ण शुभेच्छा आणि उत्तमोत्तम सदिच्छा.
नवरोजचा सण नवीनता, आशा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पारशी समाजाचा हा महत्त्वाचा सण म्हणजे आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा करण्याचे एक निमित्त आहे. पारशी समाजाची उद्यमशीलता आणि समाज कल्याणाप्रती समर्पितता यांनी आपल्या देशाच्या प्रगतीत अनमोल योगदान दिले आहे.
हा विशेष सण सर्वांसाठी शांतता आणि भरभराट घेऊन येवो आणि प्रत्येक नागरिकाला समावेशक राष्ट्राच्या उभारणीत योगदान देण्यासाठी प्रेरित करो हीच सदिच्छा.”
राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2156646)
आगंतुक पटल : 28