संरक्षण मंत्रालय
79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी भारतीय तटरक्षक दलाच्या 5 कर्मचाऱ्यांना तटरक्षक पदके देण्यास मान्यता दिली
Posted On:
14 AUG 2025 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिन 2025 च्या पूर्वसंध्येला भारतीय तटरक्षक दलाच्या 5 कर्मचाऱ्यांना तटरक्षक पदके मंजूर केली आहेत. या कर्मचाऱ्यांचे उल्लेखनीय शौर्य, कर्तव्याप्रति असामान्य निष्ठा आणि प्रशंसनीय सेवेसाठी ही पदके देण्यात येतात. पदक विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
तटरक्षक पदक (शौर्य)
- कमांडंट श्रीनिवास गडाम
- कमांडंट (कनिष्ठ श्रेणी) अंकित शर्मा
- कमांडंट (कनिष्ठ श्रेणी) राजकमल अत्री
तटरक्षक पदक (प्रशंसनीय सेवा)
- महानिरीक्षक अनुपम राय
- उप महानिरीक्षक विभूती रंजन
* * *
शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156644)