पंतप्रधान कार्यालय
जम्मू-काश्मीरमधील किश्तवार येथे ढगफुटी आणि पुरामुळे बाधित झालेल्यांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली एकतेची भावना आणि दिले सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
Posted On:
14 AUG 2025 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यात ढगफुटी आणि त्यानंतरच्या आलेल्या पूरस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या आपत्तीग्रस्तांना वेळेवर मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"जम्मू-काश्मीरमधील किश्तवार येथे ढगफुटी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्वांसोबत माझ्या भावना आणि प्रार्थना आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल.”
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156639)