सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती हब योजनांच्या 100 लाभार्थ्यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ‘विशेष अतिथी’ म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण


स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत होणारे समारंभ आणि वारसा भेटींमध्ये देशभरातील विशेष पाहुणे सहभागी होणार

Posted On: 14 AUG 2025 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2025

 

नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळा 2025 मध्ये ‘विशेष अतिथी’ म्हणून सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती हब (एनएसएसएच) योजनांचे शेकडो लाभार्थ्यांना त्यांच्या जोडीदारांसह आमंत्रित केले आहे.

अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींमधील (एससी/एसटी) व्यक्तींमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे तसेच केंद्र सरकारच्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठीच्या सरकारी खरेदी धोरणांतर्गत निश्चित करण्यात आलेली अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींच्या एमएसईकडून 4% खरेदीची अट पूर्ण करणे या उद्देशांसह ऑक्टोबर 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते एनएसएसएच योजना सुरु करण्यात आली.हा उपक्रम एससी/एसटी उद्योजकांना संपूर्ण पाठबळ प्रदान करतो. सध्या 1.48 लाख एससी/एसटी उद्योजक एनएसएसएच योजनेंतर्गत देण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घेत आहेत.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले हे लाभार्थी ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही भागांतील असून ते ईशान्येकडील 6 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांसह देशातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. या विशेष पाहुण्यांच्या सन्मानार्थ 15 ऑगस्ट रोजी केंद्रीय एमएसएमई मंत्री तसेच केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री या पाहुण्यांसाठी दुपारी भोजन समारंभ आयोजित करतील. हे पाहुणे दिल्लीतील ऐतिहासिक स्मारकांना देखील भेट देतील.

 

* * *

शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156392)