केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोग 1 ऑक्टोबर 2025 पासून शताब्दी वर्ष साजरे करण्यास सज्ज


यूपीएससी गुणवत्ता आणि सार्वजनिक सेवेच्या वचनबद्धतेची 100 वर्षे साजरी करत आहे" - यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार

Posted On: 12 AUG 2025 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025

 

केंद्रीय लोकसेवा आयोग हे संवैधानिक प्राधिकरण (यूपीएससी) आपल्या अस्तित्वाची 100 वर्षे साजरी करत आहे. वर्षभर चालणारे कार्यक्रम आणि उपक्रम यांच्या मालिकाचा अंतर्भाव असणारा शताब्दी वर्षाचा उत्सव 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल आणि 1ऑक्टोबर 2026 पर्यंत चालेल. यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयोगाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला.

भारत सरकार कायदा, 1919 च्या तरतुदी आणि ली कमिशन (1924) च्या शिफारशींनुसार, 1 ऑक्टोबर 1926 रोजी भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. नंतर संघीय लोकसेवा आयोग (1937) असे नाव देण्यात आले, 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या संविधानाचा स्वीकार झाल्यानंतर ते केंद्रीय लोकसेवा आयोग असे बदलण्यात आले.

"स्थापनेपासूनच, यूपीएससी पारदर्शकता, निष्पक्षता आणि गुणवत्तेचे प्रतीक राहिले आहे, जे सरकारी सेवांमध्ये वरिष्ठ पदांसाठी कठोर आणि निष्पक्ष प्रक्रियेद्वारे सर्वात पात्र उमेदवारांची निवड सुनिश्चित करते," असे यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांनी सांगितले.

या उत्सवाचा एक भाग म्हणून आयोगाच्या राष्ट्रसेवेचे प्रतीक असलेला लोगो आणि टॅगलाइन जारी करण्याची योजना यूपीएससी आखत आहे. विविध नवनवीन उपक्रम आणि सुधारणांचे नियोजन केले जात असून शताब्दी वर्षादरम्यान ते सुरू केले जातील.

तयारीबद्दल बोलताना अजय कुमार पुढे म्हणाले, "आम्ही कार्यक्रमांची यादी तयार करताना आमच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती आणि सूचना देखील मागवल्या. त्यांना शताब्दी वर्षाच्या उत्सवाचा अविभाज्य भाग बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रक्रियेत आम्हाला काम करण्यासाठी काही खरोखरच मौल्यवान सूचना प्राप्त झाल्या आहेत.”

"शताब्दी वर्षाचे समारंभ आपल्याला आपल्या वारशाकडे अभिमानाने पाहण्याची, सुधारणेच्या दृष्टीने आत्मपरीक्षण करण्याची आणि राष्ट्र उभारणी प्रक्रियेत सर्वोत्तम मानवी संसाधने तैनात करून देशाला अभिमानित करण्याची संधी देतील. यूपीएससीच्या पुढील 100 वर्षांच्या वैभवासाठी पथदर्शक आखण्याची ही एक संधी आहे," असे अजय कुमार म्हणाले.

 

* * *

सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155517)