संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन सिंदूर हा भारताकडे स्वदेशी विकसित सामर्थ्याने शत्रूंना पराभूत करण्याची क्षमता  असल्याचा पुरावा आहे: संरक्षण मंत्री

Posted On: 10 AUG 2025 2:18PM by PIB Mumbai

 

ऑपरेशन सिंदूर हे भारताकडे स्वदेशी विकसित सामर्थ्याने शत्रूंना पराभूत करण्याची क्षमता असल्याचा पुरावा आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी मध्य प्रदेशातील उमरिया येथे ग्रीनफील्ड रेल्वे उत्पादन सुविधा असलेल्या बीईएमएल रेल हब फॉर मॅन्युफॅक्चरिंग (BRAHMA) ची पायाभरणी करताना म्हटले आहे. ही कारवाई म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या घृणास्पद आणि भ्याड दहशतवादी हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या निर्णायक प्रत्युत्तराने देश आता आपल्या अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर हल्ला सहन करणार नाही असा एक खणखणीत आणि स्पष्ट संदेश दिला गेला आहे यावर त्यांनी भर दिला. आम्ही कोणालाही चिथावणी देत नाही, परंतु जे आम्हाला चिथावणी देतात त्यांना मोकळे सोडणार नाहीअसे ते पुढे म्हणाले.

A person standing at a podium with a microphone and flowersDescription automatically generated

ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या स्वयंपूर्णतेचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे उद्धृत करताना संरक्षण मंत्री म्हणाले की सशस्त्र दलांनी स्वदेशी निर्मित शस्त्रास्त्रांचा प्रभावीपणे वापर केला, ज्यांनी  या ऑपरेशनच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. "भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याची प्रतिज्ञा केल्यामुळेच तो या स्थानावर पोहोचू शकला," असे ते म्हणाले.

A person speaking into a microphoneDescription automatically generated

आज भारत केवळ आपल्या भूमीवर शस्त्रास्त्रे तयार करत नाही तर मित्र देशांच्या सुरक्षा गरजा देखील पूर्ण करत आहे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले."आपले संरक्षण उत्पादन आणि निर्यात अभूतपूर्व वेगाने वाढत आहे आणि त्याने विक्रमी संख्या गाठली आहे. हे नव्या भारताचे नवीन संरक्षण क्षेत्र आहे," असे ते म्हणाले.

A group of people sitting on a stageDescription automatically generated

***

सुषमा काणे/संदेश नाईक/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2154851)