पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
जागतिक सिंह दिन 2025 उद्या गुजरातमध्ये साजरा केला जाणार
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गुजरातमधील बर्दा वन्यजीव अभयारण्यात जागतिक सिंह दिनाच्या समारंभात होणार सहभागी
180 कोटी रुपयांचा वन्यजीव संवर्धन उपक्रम सुरू केला जाणार
गुजरातमध्ये जागतिक सिंह दिन 2025च्या समारंभात 11 जिल्ह्यांतील लाखो विद्यार्थी व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होणार
Posted On:
09 AUG 2025 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2025
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, गुजरात सरकारच्या वन व पर्यावरण विभागाच्या सहकार्याने, 10 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील बर्दा वन्यजीव अभयारण्यात जागतिक सिंह दिन – 2025 साजरा करणार आहे.
या उत्सवाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, गुजरातचे वनमंत्री मुलुभाई बेरा, संसद सदस्य, राज्याचे आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.
4W5M.jpeg)
दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा जागतिक सिंह दिन, जगभरात सिंहांच्या संवर्धन आणि संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. गुजरातमध्ये, आशियाई सिंह हा एक अद्वितीय पर्यावरणीय आणि सांस्कृतिक खजिना आहे, जो फक्त सौराष्ट्र प्रदेशात आढळतो. प्रोजेक्ट लायन अंतर्गत मंत्रालय आणि राज्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तसेच गुजरात सरकारच्या नेतृत्वाखाली या प्रतिष्ठित प्रजातीचे अस्तित्व आणि वाढ खात्रीशीर करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.
'जंगलाचा राजा' - आशियाई सिंहाच्या संवर्धन आणि संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी गुजरातमधील सौराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये 'जागतिक सिंह दिन' साजरा केला जाईल. सौराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये सुमारे 35,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे फिरतात. 2020 पासून गुजरातमधील सिंहांची संख्या 32% ने वाढली आहे, मे 2025च्या सिंहांच्या संख्येच्या अंदाजानुसार 2020 मध्ये 674 वरून ही संख्या 891 पर्यंत वाढली आहे.
JXMQ.jpeg)
पोरबंदर आणि देवभूमी द्वारका जिल्ह्यांमध्ये 192.31 चौरस किमी क्षेत्रफळ असलेले बर्दा वन्यजीव अभयारण्य आशियाई सिंहांसाठी दुसरे घर म्हणून उदयास येत आहे. 2023 मध्ये सिंहांचे नैसर्गिक स्थलांतर झाल्यानंतर, सिंहांची संख्या 17 झाली आहे, ज्यामध्ये 6 प्रौढ आणि 11 शावकांचा समावेश आहे. हे अभयारण्य एक महत्त्वपूर्ण जैवविविधतेचे केंद्र आहे आणि आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. द्वारका-पोरबंदर-सोमनाथ पर्यटन सर्किटच्या परिसरात असल्याने, बर्दा परिसरात पर्यटनाची मोठी क्षमता आहे. सुमारे 248 हेक्टर क्षेत्रात एक सफारी पार्क उभारण्याची योजना आहे ज्यासाठी राज्य सरकारने जमीन वाटप केली आहे. या कार्यक्रमात सुमारे 180 कोटी रुपयांच्या वन्यजीव संवर्धनाच्या कामांचाही शुभारंभ केला जाईल.
VNZR.jpeg)
या कार्यक्रमात ग्रेटर गिर लायन लँडस्केपमधील 11 जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयातील लाखो विद्यार्थी उपग्रह संप्रेषणाद्वारे सामील होतील. 2024 मध्ये, जागतिक सिंह दिनानिमित्त 18.63 लाख विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
* * *
शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2154645)