गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सीता मातेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र  विकासासाठी केले  भूमिपूजन


विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक याचा  स्वीकार करणार नाहीत

Posted On: 08 AUG 2025 6:37PM by PIB Mumbai

 

 

केंद्रीय गृह  आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील माता सीतेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र  विकासासाठी भूमिपूजन केले.  अमित शाह यांनी सीतामढी ते दिल्ली या अमृत भारत ट्रेनला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला.

आपल्या भाषणात केंद्रीय गृह  आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले की, आज माता जानकी यांचे जन्मस्थान असलेल्या पुनौरा धाम मंदिर परिसराच्या विकासासाठी भूमिपूजन करणे हा केवळ सीतामढी, मिथिला आणि बिहारसाठीच नव्हे तर संपूर्ण देश आणि जगासाठी एक अतिशय शुभ प्रसंग आहे.

अमित शाह म्हणाले की, पुनौराधाममध्ये सुमारे 890 कोटी रुपये खर्चून 68 एकरपेक्षा जास्त जागेवर शक्तीस्वरूपा जगतजननी माता जानकी यांचे भव्य मंदिर बांधले जाईल. ते म्हणाले की, माता सीतेचे जीवन चरित्र  आणि रामायणातील कथा इथल्या परिक्रमा पथ, ध्यान केंद्र वाटिका, धार्मिक जलस्रोतांची पुनर्बांधणी, धर्मशाळा, कॅन्टीन, वैद्यकीय सुविधा आणि डिजिटल गॅलरीमध्ये सांगितल्या जातील. ते म्हणाले की, 3D अनुभवाद्वारे आपल्या तरुण पिढ्यांना श्री रामांसह माता जानकीच्या जीवनातील सर्व प्रेरणादायी घटना पाहता येतील.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले  की, आज सीतामढी-दिल्ली अमृत भारत ट्रेन देखील सुरू करण्यात आली आहे.

अमित शहा म्हणाले की, माता सीतेच्या श्रीरामांशी झालेल्या पहिल्या भेटीपासून ते लव-कुश यांचे जन्मस्थान , माता सीता यांचे अंतिम निवासस्थान आणि पंथ पाकर   पर्यंत सर्व स्थानांचे  पुनरुज्जीवन करून माता सीतेची जीवनगाथा देशाच्या महिला शक्तीला समर्पित केली जाईल.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, बिहार निवडणुकीपूर्वी सर्व वर्तमानपत्रांमध्ये विशेष पुनरीक्षण प्रक्रिया (SIR) करावी की नाही याविषयी बातम्या प्रसिद्ध होत आहेत.  घुसखोरांचे नाव मतदार यादीतून काढून टाकू नये का आणि निवडणूक आयोगाने 'SIR' करावे की नाही अशी विचारणा त्यांनी जनतेला केली.  शाह म्हणाले की, बांगलादेशातून भारतात घुसलेल्या आणि आपल्या तरुणांच्या नोकऱ्या हिरावून घेणाऱ्यांना वाचवण्याची विरोधी पक्षाची इच्छा आहे.  ते म्हणाले की, विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक ते स्वीकारणार नाहीत.  शाह म्हणाले की, विरोधी पक्षानी मतपेढीचे राजकारण थांबवावे.

भारतात जन्म झालेला नाही त्यांना आपले संविधान मतदानाचा अधिकार देत नाही असे गृहमंत्री म्हणाले .

***

निलिमा चितळे/सुषमा काणे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2154492)