पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला
पुतिन यांनी युक्रेनशी संबंधित ताज्या घडामोडींची पंतप्रधानांना दिली माहिती
रशिया-युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या दृढ भूमिकेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी केला पुनरुच्चार
पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना चालू वर्ष अखेरीला वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारतात येण्यासाठी आमंत्रित केले
Posted On:
08 AUG 2025 6:31PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
पुतिन यांनी पंतप्रधानांना युक्रेनशी संबंधित ताज्या घडामोडींची माहिती दिली.
पुतिन यांच्या सविस्तर मूल्यमापनाबद्दल त्यांचे आभार मानून, रशिया-युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा, या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेतला, आणि भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी पुतिन यांना चालू वर्षाच्या अखेरीला 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेकरिता भारतात येण्यासाठी आमंत्रित केले.
***
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2154443)