रेल्वे मंत्रालय
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भावनगर येथील कंटेनर उत्पादन कंपनीला भेट
Posted On:
03 AUG 2025 8:14PM by PIB Mumbai
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, कामगार व रोजगार, युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुखभाई मांडविया, आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बंभानिया यांनी भावनगर जिल्ह्यातील नवगाम येथे असलेल्या 'आवडकृपा प्लास्टोमेक प्रा. लि.' या कंटेनर उत्पादन कंपनीला भेट दिली.

रेल्वे मंत्र्यांनी भावनगर-राजकोट रोडवरील या कंपनीत उत्पादित कंटेनर्सची सविस्तर माहिती घेतली तसेच आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले.

भावनगर आता कंटेनर निर्मिती केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नवगाम येथील कंटेनर उत्पादन कंपनी सध्या दररोज सुमारे 15 कंटेनर्स उत्पादन करत असून, कंपनीकडे आता दररोज 100 कंटेनर्स उत्पादन करण्याइतक्या सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.

रेल्वे मंत्र्यांनी उत्पादन प्रक्रियेचा व तंत्रज्ञानाचा बारकाईने आढावा घेतला आणि भविष्यातील वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सर्व प्रकारचा पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
***
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2152002)