माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वर्ष 2023 च्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
‘12th फेल’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार
शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, राणी मुखर्जी यांना मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित
विजयराघवन आणि मुथुपेट्टई सोमू भास्कर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार, तर उर्वशी आणि जानकी बोडीवाला ठरल्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
एव्हीजीसी (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग अँड कॉमिक) मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून हनु-मॅनची निवड
Posted On:
01 AUG 2025 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ‘ज्युरी’ - अर्थात निवड समितीने आज वर्ष 2023 च्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.
या घोषणेपूर्वी फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, नॉन-फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष पी. शेषाद्री, जेएस (फिल्म्स) डॉ. अजय नागभूषण एमएन, जेएस (फिल्म्स) यांनी वर्ष 2023 च्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी सादर केली. यावेळी ‘पीआयबी’चे (पत्र सूचना कार्यालय) महासंचालक मट्टू जे. पी. सिंह देखील उपस्थित होते. यंदा या पुरस्कारांसाठी एकूण 332 फीचर फिल्म, 115 नॉन फीचर फिल्म, 27 पुस्तके आणि 16 समीक्षकांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या.
यादीमध्ये पुढील पुरस्कारांचा समावेश आहे:
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया निर्मित, सौम्यजीत घोष दस्तीदार दिग्दर्शित ‘फ्लॉवरिंग मॅन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म पुरस्कार जाहीर झाला. प्रत्येकी 3 लाख रूपये आणि स्वर्ण कमळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या मराठी चित्रपटाला दिग्दर्शनासाठी पदार्पणाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार. 3 लाख रूपये आणि स्वर्ण कमळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुधाकर रेड्डी यक्कंती दिग्दर्शित नाळ 2 या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. 3 लाख रूपये आणि स्वर्ण कमळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कबीर खंदारे याला जिप्सी या मराठी चित्रपटासाठी, तर त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप या कलाकारांना नाळ 2 या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून सुजय सुनील डहाके दिग्दर्शित श्यामची आई, या चित्रपटाची निवड झाली.
याशिवाय,उत्कृष्ट लघुचित्रपट म्हणून गिध्द (हिंदी), उत्कृष्ट दिग्दर्शन- द फर्स्ट फिल्म (हिंदी) यांची निवड झाली.
तसेच संपूर्ण मनोरंजनात्मक चित्रपट म्हणून रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाची निवड झाली. तसेच राष्ट्रीय, सामाजिक मूल्ये प्रसारित करणारा चित्रपट म्हणून मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाची निवड झाली. या चित्रपटाला रजत कमळ आणि रोख दोन लाख रूपये पुरस्कारार्थ दिले जातील. आज जाहीर झालेल्या पुरस्कारामध्ये ‘द केरळ स्टोरी’ या हिंदी चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल सुदीप्तो सेन यांना स्वर्ण कमळ आणि तीन लाख रूपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. तर ‘जवान’ चित्रपटासाठी शाहरूख खान याला रजत कमळ दिले जाईल.
पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी येथे पाहता येईल.
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2151619)
Read this release in:
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam
,
English
,
Assamese
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi